🌟सकल मराठा समाजाच्या वतीने विशेष चौकशी समितीच्या निषेधार्थ 11 मार्चला मूक मोर्चा.....!


🌟परभणीत सकल मराठा समाजाची बैठक संपन्न : एसआयटी चौकशीचा निषेध🌟

परभणी (दि.05 मार्च) : मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनावर लावण्यात आलेली विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटीच्या विरोधात 11 मार्च रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. 


परभणी येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात आज मंगळवार दि.05 मार्च रोजी सकल मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या  बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तसेच गाव खेड्यातील व शहरातील सकल मराठा समाजातील बांधव उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले. मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात स्थापन केलेल्या एसआयटी विरोधात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचे ठरले. येणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातील दोन उमेदवार उभे करण्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले. तसेच सर्व नेत्यांना गावबंदी करण्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले. तसेच जिल्ह्याची समन्वय समिती स्थापन करणे हे ठराव घेण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या