🌟परभणी जिल्ह्यातील कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर यांचा 10 मार्च रोजी कार्यगौरव सोहळा....!


 🌟‘समाजोन्नतीचे ध्यासपर्व’ या चित्रफितीचे देखील प्रदर्शन🌟

परभणी (दि.02 मार्च) :  कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर चरित्रग्रंथ प्रकाशन व कार्यगौरव सोहळा रविवार 10 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजता पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी मंगल कार्यलयात आयोजित करण्यात आला आहे.

          समाजिक परिवर्तन, शेती विकास, उदयोग, जलसंवर्धन, वृक्षारोपण, एक गाव एक स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी आदी कार्यामुळे सबंध महाराष्ट्रात स्वतःसह परभणीचे नाव पोहचवणारे व्यक्तिमत्व म्हणून कांतराव काका देशमुख यांची ओळख आहे. त्यांच्या या कार्याची प्रेरणा समाजातील गरजू लोकांना व्हावी त्याचबरोबर कार्यकर्तृत्वाचा सन्मान व्हावा या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात  मदन पाटील लिखित व गंगाधर बनबरे संपादित मकांतायण-कांतराव काका देशमुखांची कार्यगाथाफ या पुस्तकाचे प्रकाशन व कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘समाजोन्नतीचे ध्यासपर्व’ या चित्रफितीचे प्रदर्शन होणार आहे.

          या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. पुरुषोत्तम खेडेकर हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणूनकृषिरत्न विजयअण्णा बोराडे , सत्कारमूर्ती कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त  मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रसिद्ध कवि इंद्रजित भालेराव, माजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रसिध्द वक्ते तथा इतिहासकार गंगाधर बनबरे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, परभणी मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर आदी मान्यवर उपस्थित  राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर चरित्रग्रंथ व कार्यगौरव सोहळा समितीचे अध्यक्ष  विठ्ठल भुसारे व सर्व समिती सदस्य यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या