🌟डाकू पिंपरी येथील गोदावरी नदीच्या पत्रातून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना अवैधरित्या वाळू उत्खनन🌟
परभणी (दि.02 फेब्रुवारी) : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या डाकूपिंपरी शिवारात 30 जानेवारी रोजी महसूल विभागाला पन्नास ब्रास वाळू साठा आढळून आला. पंचनामा केल्यानंतर हा वाळू साठा जप्त करण्यात आला.
पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथे गोदावरी नदीच्या पत्रातून मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वाळू उत्खनन सुरू आहे. वाळूचे विनापरवाना उत्खनन केल्यानंतर गोदावरी नदीच्या काठालागतच शेतात या वाळूचे साठे केले जातात. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर तलाठी अरविंद चव्हाण यांनी डाकू पिंपरी शिवारात पहाणी केली. त्यांना गोदावरी नदीच्या काठावरील शेतात वाळूसाठा आढळून आला. याची माहिती त्यांनी तहसीलदारांना दिली. त्यांच्या आदेशानुसार सदरील वाळू जप्त करून वाळू पाथरी येथील नियोजित शासकीय वाळू डेपोच्या जागेमध्ये आणून टाकण्यात आला. दरम्यान, डाकू पिंपरी प्रमाणेच तालुक्यातील गुंज, मसला, गोंडगाव, मुदगल, गोपेगाव, मरडसगाव येथील गोदावरी नदी पत्रातून वाळू उपसा होत असून याकडेही महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या