🌟विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे अपार कष्ट डोळ्यासमोर ठेवून उच्च व दर्जेदार शिक्षण घ्यावे ....!


🌟सेवानिवृत्त शिक्षक तथा प्रसिद्ध समाजसेवक शेख रफिक सर यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल येथे वर्ग दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी भावपूर्ण निरोप देण्यात आला.निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ पाटील साखरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संचालक सखारामजी पाटील साखरे  गुलाब खान पठाण इंदिरा गांधी स्मारक हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक तथा प्रसिद्ध समाजसेवक शेख रफिक सर शाळेचे मुख्याध्यापक मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष डीसी डुकरे ज्येष्ठ शिक्षक बा.न.बेद्रे आदींची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक शेख रफिक सर यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या अपार कष्टाची जाणीव ठेवून उच्च व दर्जेदार शिक्षण घ्यावे शिक्षणासोबत चरित्र नीतिमत्ता व सदाचार जोपासावे अशा प्रकारचा हितोपदेश त्यांनी केला ज्येष्ठ शिक्षक बा.न.बेद्रे अजीम खान पठाण यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्ग नववीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी केले आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्येष्ठ शिक्षक एस आर सोळंके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद कर्मचारी यांनी केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या