🌟परभणीत लेक लाडकी योजनेबाबत कार्यशाळेचे आयोजन......!


🌟योजेच्या कार्यपद्धती बाबतीत दि.28 रोजी जुनी जिल्हा परिषद, जिंतूर रोड येथील गोळेगांवकर सभागृह येथे कार्यशाळा संपन्न🌟 

परभणी (दि. 27 फेब्रुवारी) : बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी या कार्यालयामार्फत 'लेक लाडकी ही योजना' राबविली जात आहे. दि. 1 एप्रिल 2023  नंतर जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी टप्प्या-टप्प्याने  तिला रुपये 1 लाख 1 हजार एवढी रक्कम देण्यात येत आहे.

परभणी शहरातील सर्व अंगणवाडी सेविका यांची लेक लाडकी योजेच्या कार्यपद्धती बाबतीत दि. 28 रोजी जुनी जिल्हा परिषद, जिंतूर रोड येथील गोळेगांवकर सभागृह येथे बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमारे यांच्या उपस्थितीत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्याशाळेस मुख्यसेविका तसेच शहरातील सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. 

महिला व बालविकास विभागामार्फत 'लेक लाडकी ही' नवीन योजना सुरु करण्यात आली असून मुलीच्या जन्मास  प्रोत्साहन देवून मुलींच्या जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणास चालना देणे, मुलीचा मत्यु दर कमी करणे, बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्य मुलींचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी प्रोत्साहीत करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत.

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या