🌟मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाच्या योजनाबाबत समाज माध्यमावरील अफावांवर विश्वास ठेवू नका...!


🌟असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ परभणी यांनी केले🌟

परभणी : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादीत मार्फत राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त निगम यांच्याकडुन कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधितुन शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज, सुक्ष्म पतपुरवठा कर्ज अशा प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात. सद्यस्थितीत शैक्षणिक कर्ज ही एकमेव योजना चालु असुन उर्वरीत योजना पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही योजना महामंडळामार्फत सुरु करण्यात आलेल्या नाहीत. 

पण सध्या फेसबुक, व्हाट्सअप, इन्स्टाग्राम, यांसारख्या प्रसार माध्यमांवर महामंडळामार्फत शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, डिलिव्हरी बॉय, वाहन कर्ज यांसाठी नवीन योजना सुरु करण्यात आल्या असल्या बाबतच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. सदर अफवांद्वारे समाजातील नागरिकांची आर्थिक फसवणुक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरी या प्रसिध्दीपत्रकांद्वारे नागरिकांस आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारच्या अफवापासुन व आर्थिक फसवणुकीपासुन सावधान रहावे. तसेच जर कोणी आपली आर्थिक फसवणुक करत असल्यास संबधित व्यक्तीविरुध्द स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करावी जेणेकरुन आपली व इतर नागरिकांची फसवणूक होणार नाही असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादीत परभणी यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या