🌟पुर्णा शहरातील शिवसेना जिल्हाप्रमुख कार्यालयात आयोजित शिवसेना दलित आघाडीच्या आढावा बैठकीस प्रतिसाद...!


🌟परभणी जिल्हा शिवसेना दलीत आघाडी जिल्हाप्रमुख संजय सारणीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न🌟 


पुर्णा : पुर्णा शहरातील झिरो टी पॉईंट परिसरातील शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेना दलित आघाडीच्या पूर्णा शहर व तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन आज गुरूवार २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास परभणी जिल्हा शिवसेना दलीत आघाडीचे जिल्हाप्रमुख संजय सारणीकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

या बैठकिची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय सारणीकर, जेष्ठ नेते साहेबराव वाटोडे, तालुकाप्रमुख सुरेश मगरे, शहरप्रमुख प्रक्षित सवणेकर, शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, गौतम दिपके, साहेबराव खंदारे, किशोर सोनूले,लिंबाजी गायकवाड, संभाजी कणकुटे, रावसाहेब थोरात, अमोल सातोरे,कंटीराम झिंजारे, माधवराव एडके, आनंद वायवळ आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक करतांना तालुकाप्रमुख सुरेश मगरे यांनी ग्रामीण भागातील मागासवर्गीय समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तर साहेबराव वाटोडे यांनी गत ३० ते ४० वर्षांपासून शिवसेनेचे काम करीत असुन पक्षात सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते असे सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय सारणीकर यांनी मागासवर्गीय समाजातील मतदारांनी संविधान वाचविण्यासाठी खा. संजय जाधव यांना पुन्हा खासदार म्हणून निवडून देणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच मागासवर्गीय बौद्ध समाजाला शिवसेनेच्या माध्यमातून खा. संजय जाधव हे योग्य तो सन्मान व न्याय मिळवून देत असुन सर्व समाजानी खंबीरपणे खा.जाधव यांच्या पाठीमागे उभे राहाण्याचे आवाहन केले. सुत्रसंचलन बाळासाहेब राउत तर आभार शहरप्रमुख प्रक्षित सवणेकर यांनी केले. बैठक यशस्वीतेसाठी उपशहरप्रमुख रतन कांबळे,प्रशांत शिंदे,महादु खंदारे, प्रेम एंगडे, कपिल खंदारे,वर्धन भिसे, आकाश वाघमारे, विशाल वाटोडे आदींनी परिश्रम घेतले. या बैठकीस पूर्णा शहर व तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून करण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या