🌟नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या काळ्या कायद्या विरोधात चक्री उपोषण....!


🌟हुजूरी सिख समुदायाकडून सुरू करण्यात आलेल्या काळ्या कायद्या विरोधातील चक्री उपोषणाचा आज तिसरा दिवस🌟

महाराष्ट्र सरकारने नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वारा साठी लागू असलेल्या गुरुद्वारा ॲक्ट १९५६ या कायद्यात संशोधन करुन केलेला नवीन गुरुद्वारा अधिनियम २०२४ हा कायदा स्थानिक हुजरी सिख समुदायाच्या धार्मिक अधिकार व मुलभूत पारंपरिक हक्कांवर गधा आणणारा असल्यामुळे स्थानिक सिख समुदायामध्ये या नवीन कायद्या विरोधात प्रचंड संताप निर्माण झाला असून सिख धर्मियांच्या धार्मिक बाबींमध्ये सरकार या कायद्यांतर्गत सरळसरळ हस्तक्षेप करीत असल्यामुळे सिख समुदायामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली असल्यामुळे दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी सरकारच्या या नवीन कायद्या विरोधात सिख समाजाकडून ऐतिहासिक जाहीर विरोध मोर्चा तर काढण्यात आलाच याशिवाय नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिख समुदायाकडून चक्री उपोषणासह निदर्शनास देखील सुरुवात करण्यात आली असून या चक्री उपोषणाचा आज रविवार दि.११ फेब्रुवारी रोजी तिसरा दिवस आहे.

महाराष्ट्र सरकारने मनमानी पद्धतीने लागू केलेल्या गुरुद्वारा अधिनियम २०२४ या काळ्या कायद्या विरोधात आज रविवारी चक्री उपोषणास बलजीत सिंघ बावरी सिख सिकलीगर सोसाइटी अध्यक्ष महाराष्ट्र,शेर सिंघ बावरी,पापा सिंघ जूनी,तूफान सिंघ टांक,साजन सिंघ टांक,भूरी सिंघ बावरी,हरजीत सिंघ टांक,रवि सिंघ बावरी,सागर सिंघ बावरी,सतपाल सिंघ बावरी,धारा सिंघ टांक,आजाद सिंघ जूनी,सलेंदर सिंघ जूनी,मंजीत सिंघ बावरी,आकाश सिंघ बावरी,कृष्णा सिंध बावरी,राजा सिंघ बावरी आदींनी आज चक्री उपोषणात सहभाग नोंदवून सरकारने लागू केलेल्या काळ्या कायद्याचा निषेध नोंदवून सरकारच्या लोकशाही विरोधी धोरणांचा धिक्कार केला.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या