🌟दुर्गा भागवत जयंती विशेष : साहित्यातील बहुरुपिणी : दुर्गा भागवत.....!


🌟दुर्गा नारायण भागवत या भारतीय विद्वान व समाजवादी लेखिका होत्या🌟

दुर्गा भागवत या लोकसंस्कृती आणि लोककलेचे संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुरेख लेखनही केले आहे. त्यांना बौद्ध अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखले जाते. जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकौशल्यांची ज्ञानवर्धक माहिती श्री.एन.कृष्णकुमारजींच्या या शब्दशैलीतून - संपादक.

  दुर्गा नारायण भागवत या भारतीय विद्वान व समाजवादी लेखिका होत्या. त्यांनी संस्कृत आणि बौद्ध साहित्याचा अभ्यास करून आदिवासी जीवनाचा अभ्यास करण्यासाठी मध्य प्रदेशातील जंगलात वेळ घालवला. नंतर त्या संशोधक म्हणून मुंबईत परतल्या आणि मराठीत पुस्तके लिहिली. मराठीतील त्या अग्रगण्य महिला दलित लेखिका आहेत. आणीबाणीला विरोध करणाऱ्या प्रमुख लेखकांपैकी त्या एक  होत्या. आज त्या नवलेखिकांच्या प्रेरणास्रोत ठरत आहेत. पद्मश्री आणि ज्ञानपीठ यांसारखे संस्थात्मक आणि नागरी सन्मान स्वीकारण्यापासूनही त्यांनी स्वतःला दूर ठेवले. दुर्गा भागवतजी यांची काही प्रसिद्ध पुस्तके अशी- १)ॲन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर २) रिडल इन इंडियन लाईफ ३) लोअर अँड लिटरेचर ४) अ डायजेस्ट ऑफ कंपरेटिव्ह फिलॉलॉजी ५) रोमान्स इन सॅक्रिड लोअर ६) अ प्रायमर ऑफ अँथ्रॉपॉलॉजी ७) अर्लि बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स इत्यादी इंग्रजी ग्रंथ, तर ८) हेन्री डेव्हिड थोरो यांच्या ग्रंथांचे मराठी अनुवाद- पैस ९) व्यासपर्व १०) डूब ११) ऋतुचक्र १२) महानदीच्या तीरावर १३) पूर्वा १४) रूपरंग १५) लोक साहित्याची रूपरेखा १६) धर्म व लोकसाहित्य १७) भावमुद्रा १८) केतकरी कादंबरी १९) प्रासंगिका आणि २०) जनतेचा सवाल आदी मराठी पुस्तके आहेत.

    दुर्गा भागवत या लोकसंस्कृती आणि लोककलेचे संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी सुरेख लेखनही केले आहे. त्यांना बौद्ध अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखले जाते. दुर्गा भागवतजींचा जन्म दि.१० फेब्रुवारी १९१० रोजी इंदूर येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई, अहमदनगर, नाशिक, पुणे अशा विविध ठिकाणी झाले. त्यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून सन १९३२मध्ये बीए परीक्षा उत्तीर्ण केली. पुढे सन १९३५ साली त्यांनी एमएची पदवी संपादन केली. शिक्षण घेत असतानाच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दुर्गाजींनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून दोन वर्षे काम केले. काही दिवसांनी त्यांनी ‘साहित्य सहकार’ या मासिकाचे संपादनही केले. त्यांनी लोकसाहित्य आणि मानववंशशास्त्र या विषयांवर विपुल प्रमाणात संशोधनात्मक लेखन केले आहे. या विषयांवरील त्यांचे बरेचसे ग्रंथ इंग्रजीमध्ये आहेत. त्यांनी वैचारिक व समीक्षात्मक लेखनही केले आहे. साने गुरुजींच्या प्रेरणेतून त्या ललित लेखनाकडे वळल्या आणि आपल्या ललित लेखनाद्वारे त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.

     दुर्गा भागवत स्वलेखनाच्या कट्टर पुरस्कर्त्या आहेत. त्यासाठी त्यांनी आणीबाणीच्या काळात सन १९७५-७७मध्ये कारावासही भोगला होता. साहित्यिक व विचारवंत यांनी शासकीय पुरस्कार स्वीकारून शासनाचा मिंधेपणा पत्करू नये, असे त्यांचे ठाम व करारी मत होते. अनेक सामाजिक चळवळींतही त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या ‘पैस‘ या ग्रंथाला ‘साहित्य अकादमी‘ पुरस्कार लाभला आहे. सन १९७५मध्ये कराड येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अभिजात रसिकता, सौंदर्यासक्ती, जीवनोत्सुक आशाप्रवण वृत्ती, तीव्र संवेदनशीलता, काव्यात्मकता व मर्मग्राही कुतूहल यांचे अपूर्व रसायन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असून त्यांच्या साहित्यातही त्याचे प्रतिबिंब पडले आहे. या सर्वांना त्यांचा सखोल व्यासंग व मार्मिक विश्लेषण यांची जोड मिळाली आहे; त्यामुळे त्यांच्या लेखनाला एक आगळा आशय व प्रगल्भता प्राप्त झाली आहे. दुर्गा भागवतजी यांचे निर्वाण दि.८ मे २००२ रोजी मुंबई येथे झाले. त्यांचे साहित्य आज महिला साहित्यिकांना प्रचंड ऊर्जा पुरवित आहे, हे येथे उल्लेखनीय!

!! त्यांच्या गौरवशाली लेखन कौशल्याला जयंतीदिनी विनम्र अभिवादन !!

    - संकलक व सुलेखक -

                           श्री.एन. कृष्णकुमार, से.नि.शिक्षक.

                           (थोर साहित्यिकांचे चरित्र व साहित्य अभ्यासक.)

                           मु. एकता चौक, रामनगर, गडचिरोली.

                          जि. गडचिरोली, मो. ७७७५०४१०८६.


                        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या