🌟वाशिम जिल्हा स्वातंत्र्यदिनापूर्वी होणार कुपोषणमुक्त ; वाशिम जिल्हा परिषद प्रशासनाचा संकल्प....!


🌟जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकूण 11485 बालके कुपोषित🌟

फुलचंद भगत

वाशिम : जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकूण 11485 बालके कुपोषित असून पुढील सहा महिन्यामध्ये या बालकांना कुपोषणातुन बाहेर काढुन येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी जिल्हा उपोषण मुक्त होणार असल्याचा विश्वास  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी (दि.20) संयुक्तपणे व्यक्त केला.  

जिल्हा कुपोषणमुक्त करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत कुपोषण मुक्तीचा कृती आराखडा तयार करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांनी कुपोषणाबाबत जिल्ह्यातील परिस्थिचती विषद केली. ते म्हणाले जिल्ह्यात शून्य ते पाच वयोगटातील 285 बालके ही अति तीव्र (सॅम) तर १०६७ बालके ही तीव्र (मॅम) श्रेणीत असे एकूण 1352 बालके कुपोषित आहेत. तसेच (SAW) बालके 2120 आणि (MUW) बालके 9365 असे जिल्ह्यातील एकुण ११४८५ बालके कुपोषित असल्याची माहिती त्यांनी दिली.

🌟कुपोषणाचा मुकाबला करण्यासाठी त्रिसुत्री कार्यक्रम

१. स्थनपानाचे प्रशिक्षण: मातेच्या दुधामध्ये 90 टक्के कुपोषण दूर करण्याची शक्त्ती असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्तनदा आणि गरोदर मातांना स्थनपान करण्याचे व्यवस्थित प्रशिक्षण आशा आणि अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या करीता आशा व अंगणवाडी सेविकांना पोषणाबाबत दोन महिन्यामध्ये तिन वेळा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर या  आशा व अंगणवाडी सेविका जिल्ह्यातील सर्व स्तनदा व गरोदर मातांना प्रशिक्षण देतील.

२. अंगणवाडी सेविकांचे योगदान: लहान मुलांचा शाररिक व बौध्दिक विकास करणे ही अत्यंत महत्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे. त्यामुळे जिथे कुपोषित बालक असतील त्या अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक सॅम, मॅम बालकांकडे 2 महिने विशेष लक्ष देतील. 

३. पालक अधिकारी व कर्मचारी: प्रत्येक अंगणवाडी करिता एक पालक कर्मचारी नेमून बालकांकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यावर देण्यात आली आहे. पालक कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेऊन त्याच्याकडुन काम करुन घेण्याकरीता क्लास वन अधिकारी यांची पालक अधिकारी तसेच सहाय्यक पालक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे.

दोन महिन्यात कुपोषणातुन मुक्ती शक्य: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे एखाद्या कुपोषित मुलांकडे बारकाईने लक्ष दिल्यास जास्तीत जास्त दोन माहिन्यामध्ये त्याला कुपोषणातुन बाहेर काढणे शक्य आहे मात्र यासाठी बाळाचे योग्य पोषण होणे गरजेचे असल्याचे  मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे यांनी व्यक्त केले

🌟कुपोषण  तक्ता: 0 ते 6 वर्ष वयोगट (जानेवारी 2024)

अ क्र तालुका SAM MAM एकुण SUW MUW एकुण

1 वाशिम 39 152 191 390 1571 1961

2 रिसोड 82 227 309 209 1343 1552

3 मालेगाव 42 197 239 654 2545 3199

4 मंगरुळपीर 20 124 144 199 1092 1291

5 कारंजा 41 142 183 167 723 890

6 मानोरा 61 225 286 501 2091 2592

एकुण 285 1067 1352 2120 9365 11485

सर्वांच्या सहकार्याने सुदृढ पिढी घडवुया: सीईओ वैभव वाघमारे

कुपोषणामुळे बालकांचा शाररिक व बौध्दिक विकास खुंटतो. कुपोषण हा गंभीर आजार नसला तरी याकडे दूर्लक्ष करणे जीवघेणे ठरु शकते. त्यामुळे जिल्ह्यातुन कुपोषण हद्दपार करुन सुदृढ पिडी घडविण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी बैठकीत व्यक्त केले. पुढे बोलतांना ते म्हणाले, कुपोषितांमध्ये ग्रामिण भागातील गरीब व शेतमजुर कुटुंबातील मुलांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे एक सामाजिक दायित्व म्हणुन या कामाकडे पाहावे. आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत विशेषत: सॅम- मॅम बालकांकडे  विशेष लक्ष देऊन त्यांना दोन महिन्यामध्ये कुपोषणातुन बाहेर काढण्याचे आवाहन वाघमारे यांनी उपस्थित पालक अधिकाऱ्यांना केले. 

बैठकीला अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे, महिला बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांच्यासह इतर विभाग प्रमुखांची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या