🌟परभणी येथे कै.रावसाहेबजी जामकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न....!


🌟नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन🌟 

परभणी : परभणी येथे नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या वतीने कै.रावसाहेबजी जामकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत स्वप्निल खरात,कुंडलिक घाटोळ, नितीन कसबे,किशन जाधव,शितल कदम या स्पर्धकांनी बाजी मारली.

         नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी वाग्ड्मय मंडळाच्या वतीने आयोजित भारतभूषण कै. रावसाहेबजी जामकर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दि.७फेब्रुवारी २०२४ रोजी  संपन्न झाली.स्पर्धेचे उदघाटन हेमंतराव जामकर अध्यक्ष नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी यांचे हस्ते चिठ्ठी उचलून करण्यात आले.संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.किरणराव सुभेदार यांचे अध्यक्षतेखाली तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले, प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.सुनिल मोडक, उपप्राचार्य डॉ.संगीता अवचार,परिक्षक प्रा.डॉ.शिवाजी परुळे, प्राचार्य डॉ मंजूषा याज्ञिक ,प्रा.सुदाम भोसले आदींची उपस्थिती होती.

        स्पर्धेची सुरुवात कै.रावसाहेबजी जामकर,सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करुन करण्यात आली.प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत करत प्रास्ताविक केले.हेमंतराव जामकर यांनी संयोजका सह स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या दरवर्षी प्रमाणे सदरील स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत संभाजी नगर येथील एम.पी.लॉ कॉलेज चा स्वप्निल खरात याने रु.५००० सह, समानचिन्ह,प्रमाणपञ स्विकारत प्रथम क्रमांक पटकावला. श्री शिवाजी महाविद्यालय परभणी चा कुंडलिक घाटोळ याने रु ३०००, समानचिन्ह,प्रमाण पञ प्राप्त करत व्दितीय क्रमांक पटकावला. ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय, नांदेड येथील नितीन कसबे याने रु २०००, सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. श्री शिवाजी महाविद्यालय परभणी चा किशन जाधव आणि ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी ची शितल कदम यांनी उत्तेजनार्थ प्रत्येकी १००० रु.सन्मान चिन्ह,प्रमाणपञ स्विकारत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले.सदरील पारितोषिक मान्यवरांसह उपप्राचार्य डॉ. संगीता अवचार यांच्या हस्ते विजेत्यांना देवून सन्मानित करण्यात आले.

       प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांचे मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ.संगीता अवचार,वाड्मय मंडळाचे प्रा.डॉ.आशा गिरी,प्रा. डॉ.ओमप्रभा लोहकरे,प्रा.डॉ.संगीता लोमटे,प्रा.डॉ.नसिम बेगम, सल्लागार समितीचे प्रा.अरुण पडघन,प्रा.निर्मला जाधव आदींनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ.आशा गिरी, प्रा.डॉ.नसिम बेगम यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या