🌟परभणी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी जागेवर निवड संधी गुरुवारी....!


🌟जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा - सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे 

परभणी (दि.20 फेब्रुवारी) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी तंत्र प्रशाला, नारायण चाळ येथे गुरुवार (दि.22) रोजी जागेवर निवडसंधीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत क्रेडिट ॲक्सेस ग्रामीन लिमिटेड परभणी या कंपनी मध्ये ट्रेनी केंद्र व्यवस्थापक या पदा करिता भरती करण्यात येणार आहे तसेच ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452-220074 वर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या