🌟वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड नजीक समृध्दी महामार्गावर लक्झरीचा अपघात.....!


🌟अपघातात १६ प्रवाशी गंभीर जखमी : पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी🌟

✍🏻फुलचंद भगत

वाशिम :- आज दि.०२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२-३० वाजेच्या सुमारास नागपूर वरून पुण्याकडे जात असलेल्य पूजा लक्झरी क्रमांक MH40BH9966 ने ट्रकला मागून धडक दिल्याने 15 जण गंभीर जखमी झाले आहेत समोर चालत असलेल्या ट्रकच्या समोर अचानक नीलगाय आडव्याल्याने ट्रक चालकांनी ब्रेक मारल्याने  मागे असलेल्या पूजा कंपनीच्या लक्झरीने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने लक्झरी मधील 15 ते 16 प्रवासी गंभीर जखमी झाले व पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

               लक्झरी अपघाताची  माहिती मिळताच 108 लोकेशन समृद्धी महामार्ग कारंजा पायलट विधाता चव्हाण डॉ भास्कर राठोड 108 लोकेशन शेलुबाजार पायलट उल्हास खिल्लारे डॉ सैफुद्दीन 108 लोकेशन शिवनी पायलट तुषार राजगिरे डॉ झाकीर  व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख 108 लोकेशन कारंजा लाड पायलट किशोर खोडके  व व डॉक्टर जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भिलांडे   अविनाश भोयर समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार, छोटू उके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले . त्यावेळी एचएसपी चे पीएसआय मधुकर राठोड पोलीस कॉन्स्टेबल आडे तसेच फायर टीम सुमित डोनेकर शुभम चव्हाण, वैभव निकुठे एम एस एफ बाळकृष्ण सावंत, गजानन सोनवणे व ग्रामीण पोलीस स्टेशनचे 112 टीमचे सर्व कर्मचारी प्रामुख्याने त्यावेळी घटनास्थळी हजर होते. जखमी असलेल्या रुग्णांची नावे  राजेंद्र यादव वय 35 नागपूर, नरेंद्र कटरे वय 45 गोंदिया, निलेश वानखडे वय 30 कापसी अकोला, समीर अदलाबादकर वय 22 नागपूर, निर्मला तायडे वय 60 राहणार पुणे, रोहन तोडकर वय 25 राहणार सांगली, प्रियंका रोहन तोडकर वय 21 वर्षे राहणार सांगली ,शुभम मेघारे वय 25 राहणार नागपूर, रुपेश घोनमोड वय 40 राहणार चंद्रपूर, पंचशीला भगत 30 राहणार संभाजीनगर, दिलीप कुमार चव्हाण वय 35 राहणार नागपूर ,विशाल केतकर वय 26 राहणार वर्धा ,मच्छिंद्रनाथ भुतकर राहणार वय ते 33 हिंगणघाट, प्रतीक्षा नासरे व 24 राहणार वर्धा ,  वय24 खुश कौशल्य मिश्रा वय 40 राहणार वर्धा, वैभव शिवणकर वय 29 राहणार भंडारा, प्रिया रमेश मुन वय 29 राहणार वर्धा, वेदांत सुभाष कांबळे राहणार धामणगाव, वय 23 कृष्णप्रकाश मिश्रा वय 42 मिर्जापुर उत्तर प्रदेश, सुवर्णा संभाजी माळी वय 40 विजयानगर सांगली, हेमंत फुलवणी राहणार वर्धा वय 40 , सुरज  राजेश बावणे वय 40 कोसंबी राहणार जिल्हा चंद्रपूर, निखिल तुरकर  वय 22तुमसर भंडारा, पूजा तायडे राहणार नागपूर वय 27

 असे नावे असल्याचे कळले.त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव साहेब यांच्या यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला अमरावती व वर्धा येथे पेशंट  रेफर केले. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी सिस्टर बामणे कक्ष सेवक विजय शिरसाठ जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भिलांडे, समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार ,अजय घोडेस्वार शंकर, रामटेके, विनोद खोड ,शुभम खोंड, अमोल गोडवे ,आशिष व छोटू उके श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी त्यावेळी मदत केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या