🌟परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली बारावी परीक्षा केंद्रांची पाहणी.....!


🌟यावेळी कर्तव्यतत्पर जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी परिक्षार्थी विद्यार्थ्यांची एकाग्रतेचा भंग होऊ नये याची दक्षता घेतली🌟


परभणी (दि.21 फेब्रुवारी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी च्या परीक्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवार (दि.21) रोजी सकाळी शहरातील 12 वी परीक्षा केंद्रास अचानक भेट देवून पाहणी केली. यावेळी श्री. गावडे यांनी परिक्षार्थी विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेचा भंग होऊ नये, याची दक्षता घेत पाहणी केली. परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालय येथील 12 वी परीक्षा केंद्रास अचानक भेट देवून जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष वर्ग भेटी देत पाहणी केली. तसेच केंद्र प्रमुखांकडून परीक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. कॉपीला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना, परीक्षा व्यवस्थेचे नियोजन व संनियंत्रण, परीक्षार्थींसाठी उपलब्ध केलेल्या सुविधा, आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था आदींचा आढावा जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी यावेळी घेतला.

जिल्ह्यातील 69 परीक्षा केंद्रावर सुमारे 26 हजार 608 परिक्षार्थी 12 वी ची परीक्षा देणार आहेत. 8 परिरक्षक केंद्रामार्फत परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कॉपीला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असुन, यासाठी विशेष भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी दिली....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या