🌟डॉ.इंदूताई पटवर्धन स्मृतिदिन विशेष : आनंदग्रामचे आजचे लोभस दर्शन......!🌟पटवर्धन घराणे हे पेशवाईतील एक निष्ठावंत व कर्तबगार घराणे होते हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवड गावचे होय🌟

डॉ.इंदूताई पटवर्धन या समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणार्‍या, डुडुळगाव येथील आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म दि.१४ मे १९२६ रोजी जमखंडी याठिकाणी झाला. इंदूताई पटवर्धन यांनी आपल्या वयाच्या १६व्या वर्षी गांधीजींच्या चळवळीस वाहून घेतले. माँटेसरी शिक्षणक्रम पूर्ण करून त्या शिक्षिका बनल्या. पुढे ब्रिटिश इंडियन रेड क्रॉस आणि सेंट जॉन अ‍ॅम्ब्युलन्सच्या कामामध्ये दाखल झाल्या. त्यांच्याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी देताहेत... संपादक.

          पटवर्धन घराणे हे पेशवाईतील एक निष्ठावंत व कर्तबगार घराणे होते. हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवड गावचे होय. या घराण्याचा मूळ पुरुष हरिभट पटवर्धन. त्याला कृष्ण, बाळ, त्रिंवक, गोविंद, रामचंद्र, माधव य भास्कर असे सात मुलगे होते. पैकी त्रिंबक, गोविंद व रामचंद्र हे प्रसिद्धीस आले. हरिभट गाव सोडून बहिरेवाडी येथे आला. तेथे त्याचा इचलकरंजीकर घराण्याचे संस्थापक नारो महादेव जोशी यांच्याशी कुलोपाच्याया म्हणून संबंध आला. इचलकरंजीकर व पेशवे यांचे विवाहसंबंधाचे नाते होते. त्यामुळे याचा बाळाची विश्वनाथाशी संबंध आला. गोविंदरावाने इंद्रोजीच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी त्यास त्याच्या सैन्याचे आधिपत्य दिले. अशा रीतीने पटवर्धनांनी मराठी राज्याच्या सेवेस सुरुवात केली. भाऊ रामचंद्रराव याने वसईच्या मोहिमेत मराठ्यांच्या बाजूने मोठा पराक्रम गाजवला. गोविंदरावाच्या पराक्रमामुळे व स्वामिभक्तीमुळे त्याचे नाव सर्वत्र झाले होते. बाळाजी बाजीरावाने आपले पाच हजांरांचे पथक गोविंगरावाच्या स्वाधीन करून त्याची नवीन कामगिरीवर नेमणूक केली. या दोन्ही भावांबरोबर हरिभटाचे आणखी दोन मुलगे-त्रिंबकराव व भास्करराव हेही त्यांना सामील झाले. तसेच पटवर्धनांचा इतर परिवारही पेशव्यांच्या सैन्यात व चाकरीत दाखल झाला. माळवा १७२८- १७४०, दिल्ली २७३७- १७३९, बुंदेलखंड १७४१, गुजरात १७३१- १७५५ आणि कर्नाटक- सावनूरचा नबाब, हैदर व टिपू यांविरुद्ध झालेल्या लढायांत पटवर्धन घराण्यातील अनेक पुरुषांनी मोठा पराक्रम करून पेशव्यांना यश प्राप्त करून दिले. त्यामुळे त्याला १७५५ मध्ये नगाऱ्याचा मान देण्यात आला. सदाशिवराव भाऊ व पटवर्धन यांचे एवढे सूत नव्हते. शिवाय गोविंदराव दक्षिणेच्या स्वारीत गुंतल्यामुळे पटवर्धनांपैकी पानिपतच्या लढाईत कोणीही हजर नव्हते. पण भाऊसाहेबाच्या साह्यास जाणाऱ्या बाळाजी बाजीरावाबरोबर पटवर्धन उत्तरेत गेले होते. शिवाय सन १७५०नंतर दक्षिणेची बाटू मुख्यतः पटवर्धनांनी सांभाळली होती.

        पटवर्धन घराण्याने सन १७४० ते १८००पर्यंत मराठी राज्यासाठी अतोनात कष्ट घेतले. अनेक लढायांमध्ये ते आघाडीवर होते. ६० वर्षांच्या कारकीदींत या घरण्यातील तीस कर्ते पुरुष धारातीर्थी पडले. रघुनाथराव व माधवराव पेशवे यांच्या भांडणामुले पटवर्धन घरण्यास काही काळ प्रतिकूल गेला. रघुनाथरावाने पटवर्धनांच्या मुख्य ठिकाणावर म्हणजे मिरजेवरच चढाई केली. याचा तात्कालिक परिणाम म्हणजे गोविंदरावाचा मुलगा गोपाळराव निजामाकडे गेला. परंतु पुढे माधवराव पेशव्यांनी पटवर्धनांना आपल्या बाजूस वळवून घेऊन राक्षसभुवन येथे निजामाचा पराभव केला. पेशव्यांनी पटवर्धनांना २५ लाखांचा सरंजाम आणि त्यासाठी मिरज व तुंगभद्रा-कृष्णेमधील प्रांत दिला आणि ८,००० घोडदळ सरकारी तैनातीत ठेवण्याची आज्ञा केली. गोविंदरावाचा मुलगा गोपाळराव आणि रामचंद्ररावाचा मुलगा परशुरामभाऊ हे आपल्या वडिलांसारखेच शूर व कर्तबगार निघाले. भाऊंनी तासगाव येथे आपले वास्तव्य कायम केले.

           पटवर्धनांना मोठा सरंजाम मिळाल्यामुळे त्यांचे रजकीय महत्त्व वाढले. कर्नाटकातील हैदर व टिपू यांच्या विरुद्ध झालेल्या लढायांचा सर्व भार त्यांच्यावरच होता. ती कामगिरी पार पाडून त्यांनी कर्नाटक आपल्या ताब्यात ठेवले. सन १७७१ साली हैदरविरुद्ध झालेल्या स्वारीत गोपाळरावास मृत्यू आला व पुढे काही दिवसांतच गोविंदरावही मरण पावले. नारायणरावाच्या वधानंतर पटवर्धनांनी सवाई माधवरावाची बाजू उचलून धरली. गुजरातच्या स्वारीत गोविंदरावाचा दुसरा मुलगा वामनराव हरिपंत फडक्यांबरोबर होता. तो सन १७७५मध्ये मरण पावला. गोविंदरावाचा तिसरा मुलगा यास सरंजाम देऊन कर्नाटकात हैदरविरुद्ध पाठविले. सन १७७७च्या सावशीच्या लढाईत तो गंभीर जखमी झाला. या लढाईत पटवर्धनांची फारच हानी झाली. पटवर्धनांपैकी कुरुंदवाडचे कोन्हेरराव पडले आणि गोविंदरावाचा तिसरा मुलगा पांडुरंगराव, शीपतराव व वासुदेवराव यांना कैद झाली. चिंतामणरावाच्या नावे सन १७८३मध्ये सरंजाम दिला. सन १७९०-९१मध्ये टिपूविरूद्ध झालेल्या लढाईत परशुरामभाऊस महत्त्वाचे स्थान होते. सन १७९५च्या खर्ड्याच्या लढाईत चिंतामणराव हजर होते, तर विठ्ठल धोंडो याने खूपच मोठा पराक्रम केला. दुसऱ्या बाजीरावाने पटवर्धनांचा अनन्वित छळ केला. परशुरामभाऊंना कैदेत टाकले; परंतु पटवर्धनांनी मराठी राज्याच्या सेवेत कोणतीच कसूर न करता आपले प्राण वेचले. सन १८१७मध्ये खडकीच्या बाजीराव-इंग्रज लढाईत तसेच सन १८१८मध्ये कोरेगाव व आष्टी या लढायांत पटवर्धनांनी भाग घेतला होता. तद्नंतर त्यांनी इंग्रजांचे मांडलिकत्व पतकरले. 

       दुसर्‍या महायुद्धात डाॅ.इंदूताई प्रत्यक्ष कामासाठी ब्रह्मदेश, जावा येथे गेल्या. सिंगापूर, जपान, येथेही त्यांनी काम केले. त्यांचे भाऊ राजा परशुराम शंकरराव पटवर्धन हे भारतीय राजघराण्यांपैकी पहिले! पुणे म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट त्यांनीच स्थापन केली. "आपल्या सामाजिक विचारांची त्यांनी मोठी घडण केली," असे डॉ.इंदूताई म्हणतात. सेवेतून १९५३मध्ये निवृत्त झाल्यावर होमिओपॅथीचे त्यांनी शिक्षण घेतले. खेड शिवापूर येथे दवाखाना सुरू केला. आदिवासी आणि सैन्यातील जवानांसाठी त्यांनी सतत परिश्रम घेतले. कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी काम सुरू केले ते १९६५मध्ये. आळंदी जवळच्या आनंदग्राम येथे सन १९७०मध्ये त्यांनी स्थलांतर केले. उला लेडी हाइड पार्कर, राधा रमणजी, अशा व्यक्तींच्या सक्रिय साह्यामुळे आनंदग्रामला सद्याचे विशाल स्वरूप आल्याचा त्या कृतज्ञतेने उल्लेख करतात. सन १९६५मध्ये महाराष्ट्र शासनाचा भिक्षा प्रतिबंध कायदा अमलात आला, तेव्हा ८० रुग्णांसह फुगेवाडी येथे त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले. आनंदग्रामची उभारणी कुष्ठरोग्यांनीच केली.

           सद्या येथे शेती, कुक्कुटपालन, गोपालन, चर्मकाम, कापड उद्योग आदी अनेक उपक्रम यशस्वीपणे चालविले जातात. सुबाभूळ, रेशमासाठी तुती, इत्यादींची लागवड केली जाते. मुला-मुलींनी फुलून आलेल्या शाळा, शेतीला नियोजन करून दिलेले पाणी, सदैव कार्यरत असलेले हात, हे आनंदग्रामचे आजचे लोभस दर्शन आहे. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारी संस्था उभी करणार्‍या डाॅ.इंदुताई पटवर्धन या एकमेव महिला आहेत. अशा या थोर समाजसेविकेचे दि.८ फेब्रुवारी १९९९ रोजी दुःखद निधन झाले.

!! डाॅ.इंदूताई पटवर्धन यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!

      - संकलन व सुलेखन -

                   श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                    एकता चौक, रामनगर, गडचिरोली.

                    फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.


              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या