🌟असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमाकांत उनवणे यांनी केले🌟
परभणी (दि. 07 फेब्रुवारी) : कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांचे अंतर्गत सुरु असलेल्या अभ्यासक्रमासाठी सन 2024-25 सत्रा पासुन नवीन अभ्यासक्रमास व चालु असलेल्या जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी करीता जिल्ह्यातील संस्थांना जास्तीत जास्त मंडळाचे अभ्यासक्रमासाठी मंडळाच्या http://msbsvet.edu.in/Public/Home.aspx संकेतस्थाळावरुन दि. 5 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत अर्ज भरुन मंडळाचे अभ्यासक्रम सुरु करावे व अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय परभणी येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रमाकांत उनवणे यांनी केले आहे.....
*****
0 टिप्पण्या