🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वाऱ्यावर सरकारने लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील हुजूरी सिख समुदायाचे आंदोलन यशस्वी...!


🌟जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावून साखळी उपोषणार्थीं आंदोलकांना आज दि.२९ फेब्रुवारी रोजी स्थगिती अध्यादेश बहाल🌟 

🌟 जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कार्यालयात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोडवले साखळी उपोषण🌟 


नांदेड : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पवित्र सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार साहीब तसेच पंचप्यारें साहिबान व हुजूरी सिख समुदायाला कुठल्याही प्रकारची पुर्वकल्पना न देता सिख धर्मियांसह गुरसिखीवर अपार श्रद्धा असणाऱ्यांचे पवित्र तिर्थक्षेत्र व दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर गुरुद्वाऱा अधिनियम-२०२४ हा कायदा लादला गेला होता परंतु या कायदा रद्द करण्यात यावा याकरिता हुजूरी सिख समुदायाच्या वतीने संत महापुरुषांच्या मार्गदर्शनाखाली दि.०९ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरुद्वाऱा गेट नंबर एक ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला होता.


यानंतर याच दिवसापासून दिलं.०९ फेब्रुवारी २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषण आंदोलनास सुरूवात करण्यात आली होती हुजूरी सिख समुदायाकडून नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ या कायद्याला होणारा प्रखर विरोध लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी आपल्या ट्युटर अकाऊंटवर ट्युवीट करुन सदरील नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ या कायद्याला स्थगिती दिल्याची प्रसारित करण्यात आली.परंतू महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने या संदर्भात कुठल्याही प्रकारचा अधिकृत स्थगिती अध्यादेश (जीआर) जारी करण्यात आला नसल्यामुळे महसूल व वनविभाग मंत्रालयाकडून अधिकृत स्थगिती अध्यादेश मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण आंदोलन कुठल्याही प्रकारे स्थगित करण्यात येणार नाही अशी भूमिका हुजूरी सिख समुदायासह आंदोलनकर्त्यांनी घेतली आज २९ फेब्रुवारी रोजी साखळी उपोषण आंदोलनाचा २१ वा दिवस उजाडला असतांना साखळी उपोषणास बसलेल्या स.जसबीरसिंघ बुंगई,स.मनबीसिंघ ग्रंथी,स.जगजीतसिंघ खालसा,स.प्रेमजीतसिंघ शिलेदार,स.गुरुदेवसिंघ रामगडीया आदी हुजूरी सिख बांधवांसह स.रवींद्रसिंघ बुंगई,स.मनजीतसिंघ करिमनगरवाले, स.भोलासिंघ गाडिवाले स.दिपकसिंघ हजुरीया,स.बिरेदरसिंघ बेदी,स.जगदीपसिंघ सिंघ नंबरदार,स.बलजीतसिंघ बावरी,स.मनप्रितसिंघ कारागीर,स.प्रेमज्योतसिंघ सुखई, स.बलवंतसिंघ संधु,स.बक्षीसिंघ पुजारी यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कार्यालयात सन्मानपुर्वक बोलावून जिल्हाधिकारी श्री.राऊत यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई येथील सहसचिव श्रीराम यादव यांनी आज दि.२९ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या नावाने पाठवलेला नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ या कायद्याला स्थगिती दिलेल्या स्थगिती अध्यादेश क्रमांक जियुआर-२०२४/प्र.क्र.२१/ज-७ (अ) सह साखळी उपोषण आंदोलन स्थगित करण्यात यावे असे विनंतीपत्र बहाल करण्यात आले.



यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या समक्ष माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी साखळी उपोषण आंदोलनकर्त्ते हुजूरी सिख बांधवांना महाराष्ट्र शासनाने नवीन गुरुद्वारा अधिनियम-२०२४ या कायद्याला स्थगिती दिल्याने आपण आपले साखळी उपोषण आंदोलन मागे घ्यावे अशी सरकारच्या वतीने विनंती केल्याने आंदोलनकर्त्या हुजूरी सिख बांधवांनी आज आपल्या आंदोलनाला स्थगिती दिली हुजूरी सिख समुदायाच्या वतीने सनदशीर मार्गाने तब्बल २१ दिवस सातत्याने केलेले साखळी उपोषण आंदोलन अखेर यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कार्यालयात मार्फत पाठवलेल्या स्थगिती अध्यादेशाचे पत्र घेऊन आज साखळी उपोषण आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंगजी साहीब,संत बाबा बलविंदरसिंगजी कारसेवावाले,संत बाबा ज्योतिंदरसिघजी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेऊन त्यांना पत्राची प्रत बहाल केली......





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या