🌟साहित्य व सामाजिक सेवेचे 'नानक साई फाऊंडेशनचे' संत नामदेव पुरस्कार सन्प्रमानपूर्वक दान.....!


🌟अवॉर्ड प्रदान करण्यात आल्याची माहिती नानक साई फाऊंडेशनचे संयुक्त सचिव श्रेयसकुमार बोकारे यांनी दिली🌟

नांदेड- साहित्य व सामाजिक क्षेत्रात उलेखनीय कार्य असलेल्या महानुभवांचा नानक साई फाऊंडेशनच्या वतीने दिले जाणारे संत नामदेव पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले.

नानक साई फाऊंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने घुमान चळवळीचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्त्वाखाली संत नामदेव मराठी साहित्य संमेलन श्री गुरु ग्रंथ साहिब भवन (नांदेड) येथे आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनात संत नामदेव साहित्य पुरस्कार आणि संत नामदेव लाईफटाईम अचिवमेंट अवार्ड नुकतेच प्रदान करण्यात आले. संत बाबा बलविंदरसिंघ जी,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जगदीश कदम,मराठा जगबीरसिंग पानिपत,सरदार तेजिंदरसिंघ मक्कर, मराठा  लखीराम फौजी पानिपत,सौ प्रफुल्लाताई बोकारे,संमेलनाचे मुख्य संयोजक पंढरीनाथ बोकारे हे यावेळी उपस्थित होते. दरम्यान हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

ज्येष्ठ साहित्यिक प्रा फ मु शिंदे,निर्मलकुमार सूर्यवंशी,सुदर्शन रापतवार,शिवाजी कऱ्हाळे,व्यंकटेश चौधरी,संजय वरकड,स सो खंडाळकर,डॉ हंजराज वैद्य,दत्ता डांगे,डॉ संजय बालाघाटे,डॉ. माधव जाधव,डॉ. वामन निबांजी साळवे,दिलीप गणपत आसबे,डॉ चंद्रकांत वाघमारे,डॉ. व्यंकटी पावडे,,धोंडीबा गायकवाड यांना संत नामदेव साहित्य पुरस्कार देण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उलेखनीय कार्य असलेल्या सर्वश्रीशिवाजीराव गोसावी,हणमंतराव तरटे,शंकररराव सिंगेवार,मेजर दत्तात्र्येय बचाटे,डॉ. शिवाजी शिंदे,डॉ.श्रावण रॅपनवाड,माधव आटकोरे,केशवराव पवार निवघेकर,अस्मिता दिघे,सौ. श्रद्धा राजेभोसले,अनिल उपाध्याय,संदीप बिडकर,सौ लक्ष्मी  पाटील,प्राचार्य पी.एम.पवार,सौ.ललिता चरणसिंग पवार,डॉ.प्रभाकर गुदाल,जनार्धन पाटील,कुमारी स्नेहल भालेराव यांना संत नामदेव लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आल्याची माहिती नानक साई फाऊंडेशनचे संयुक्त सचिव श्रेयसकुमार बोकारे यांनी दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या