🌟नॅशनल टॅलेंट हंट स्कॉलरशिप जिंकल्याबद्दल साक्षी काळे यांचा दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते सत्कार.....!


🌟वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील धनंजय काळे व तेजस्विनी काळे यांच्या साक्षी काळे या कन्या🌟 

फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील रहिवासी असलेल्या व सामाजिक कार्यात व व्यवसायात अग्रेसर असलेल्या धनंजय काळे व तेजस्विनी काळे यांच्या कन्या साक्षी काळे हे बडनेरा अमरावती येथील राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी अँड रिसर्च कॉलेज मध्ये बि.ई.माहिती तंत्रज्ञानाच्या अंतिम वर्षात शिकत आहे. महाराष्ट्र मधून यांची निवड  प्रतिष्ठित एजिस ग्रॅहम बेल पुरस्कारा करीता करण्यात आली आहे. नॅशनल टॅलेंट हंट स्कॉलरशिप जिंकल्याबद्दल  विद्यार्थिनी साक्षी काळे यांचा सत्कार दिल्ली येथे केंद्रीय मंत्री मा.नितीन गडकरी भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यांच्या हस्ते करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी महानगरात येऊन चांगले शिक्षण घेऊन दिल्लीच्या तक्तालाही लाजवेल असे कामगिरी करत आहे . साक्षी धनंजय काळे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरिता एक सुवर्ण क्षण निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार त्यांचे पुरस्काराकरिता निवड करण्यात येत असते. शेलुबाजार या ग्रामीण भागातील साक्षी काळे या विद्यार्थिनीची वरील पुरस्काराकरिता निवड करण्यात आली याकरिता परिसरात तिचे कौतुक करण्यात येत असुन तिचा सत्कार ही करण्यात येत आहे.                                                    

 फुलचंद भगत - मंगरुळपीर वाशिम 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या