🌟पालम तालुका भारतीय बौद्ध महासभा कार्यकारिणीची निवड...!


🌟पालम तालुकाध्यक्षपदी रावसाहेब वाहूळे तर सरचिटणीसपदी सुमेध वाघमारे यांची सर्वानुमते निवड🌟 

परभणी/पालम (दि.०४ फेब्रुवारी) - परभणी जिल्ह्यातील पालम येथील बुद्ध विहारांमध्ये आज रविवार दि.04 फेब्रुवारी रोजी दुपारी 12-00 वाजता भारतीय बौद्ध महासभेचे परभणी जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली व सरचिटणीस तुकाराम ढगे कोषाध्यक्ष गौतम वाघमारे जिल्हा हिशोब तपासणी श्रीकांत हिवाळे संघटक डॉक्टर साहेबराव गोधने यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली केंद्रीय कार्यालयाच्या आदेशानुसार पालम तालुका बौद्ध महासभा कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.

 यावेळी पालम तालुकाध्यक्षपदी रावसाहेब पांडुरंग वाहूळे सरचिटणीस पदी सुमेध कोंडीबा वाघमारे कोषाध्यक्षपदी भगवान गोविंदराव जंगले पर्यटन व प्रचार उपाध्यक्ष तानाजी शिंदे कार्यालय सचिव भीमराव रायबोले संघटक म्हणून राजकुमार वाहुळे  कपिल हत्तींबिरे  अमोल इंगळे  यांची निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारणीस वंचित बहुजन आघाडी पालम तालुक्याचे अध्यक्ष वैजनाथ हत्तींआंबिरे महासचिव सुधाकर हाणवते यांनी स्वागत करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या