🌟वसमत तालुक्यातील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी उद्घाटनावे आ.राजूभैया नवघरे म्हणाले🌟
हिंगोली/वसमत : वसमत तालुक्यातील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी समारंभाचा उद्घाटन सोहळा काल सोमवार दि.१२ फेब्रुवारी २०२४ रोजी वसमत विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू भैय्या नवघरे यांच्या हस्तें संपन्न झाला यावेळी बोलतांना ते म्हणाले की प्रशासकीय इमारत जेवढी भक्कम असेल तेवढ्याच तत्परतेने शासकीय कार्याला गती मिळून जनतेच्या सामाजिक आर्थिक कल्याणासाठी प्रशासकीय इमारत उत्कृष्ट प्रबंधनाचे मंदिर ठरत असेही ते म्हणाले.
या प्रशासकीय इमारत उद्सोघाटन सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील,विधान परिषदेचे आमदार विप्लवजी बजोरिया,विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञाताई सातव यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.जितेंद्र पापळकर (भा.प्र.से.) हे होते, विशेष उपस्थितीतांमध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मा.संजय दैने (भा.प्र.से.) यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.अनुप शेंगुलवार (अति.मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. हिंगोली), मा. डॉ. सचिन खल्लाळ (उप विभागीय अधिकारी, वसमत) मा. श्रीमती शारदा दळवी ( तहासिदर, वसमत) ,मा.प्रकाशराव ढोणे पाटील (मा. सभापती प.स. वसमत),मा. तानाजी बेंडे ( सभापति कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत ) , मा. सचिन अंबादसराव भोसले ( उप सभापति कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत), मा. उमाकांत तोटावाड (गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वसमत), मा. सुनील अंभुरे (सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, वसमत) यांची उपस्थिती लाभली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत बागल साहेब, बालूमामा ढोरे, सभापती तानाजी पाटील बेंडे, गजानन सवंडकर, गजानन ढोरे, प्रशांत अण्णा शिंदे सर्व आजी माजी सभापती, सरपंच यांची उपस्थिती लाभली.....
0 टिप्पण्या