🌟नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डावर सरकारने लादलेल्या कायद्या विरोधी साखळी उपोषण आंदोलनाचा १५ वा दिवस.....!


🌟स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिधींनी फिरवली आंदोलनाकडे पाठ : आंदोलनकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी🌟

नांदेड (दिल.२३ फेब्रुवारी) - नांदेड येथील पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर महाराष्ट्र सरकारने मनमानी पद्धतीने लादलेल्या गुरुद्वारा बोर्ड अधिनियम-२०२४ या कायद्या विरोधामध्ये मागील पंधरा दिवसापासून सिख समुदायाकडून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे परंतु सदर आंदोलनाकडे राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी सपशेल पाठ फिरवल्यामुळे आपल्या मुलभूत धार्मिक अधिकारासाठी आंदोलन करणाऱ्या सिख धर्मिय आंदोलकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सुर उमटत आहे.

      केंद्र व राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जुना गुरुद्वारा बोर्ड अधिनियम रद्द करून नवीन अधिनियम संमत करण्यात आला आहे. या अधिनियम विरोधात मागील पंधरा दिवसापासून शिख समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी पोषण करीत आहेत. विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला. परंतु केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेले भाजपच्या आमदार  व खासदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने समाजामध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसत आहे. 

     आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रवींद्रसिंग बुंगई, प्रेमज्योतसिंग सुखई, दीपकसिंग हजुरिया, तेगासिंग बावरी, मनिंदरसिंग रामगडिया, जगदीपसिंग नंबरदार व गुरुदेव सिंग रामगडीया यांनी उपोषण केले. यांच्यासोबत शेरसिंघ फौजी, गुरमीतसिंग महाजन, मनप्रीतसिंग कुंजीवाले, मनबीरसिंघ ग्रंथि , दीपकसिंघ गल्लीवाले , राजेंद्रसिंग पुजारी, जर्नलसिंग गाडीवाले, करणसिंघ लोनिवाले , रवींद्रसिंग पूजारी, कृपालसिंग हजुरिया, सिमरंजीतसिंग कुंजीवाले, हरभजनसिंघ पुजारी  दीपकसिंघ हजूरिया, बीरेंद्रसिंघ बेदी, महेन्दरसिंघ पैदल, सुरेंद्रसिंग मेंबर , जसपालसिंग लांगरी, अवतारसिंग पहरेदार , जसबीर सिंग बुगंई.गुरप्रितसिंग सोखी, मंनप्रीतसिंग कारागीर, हरभजन सिंग दिगवा. कश्मीर सिंग भट्टी.सुखविंदरसिंग हुदल, इंदर सिंग शाहू, गुरुदीपसिंघ संधू, अमरजीतसिंग कुंजीवाले, भोला सिंग गाडीवाले. किरण सिंग शाहू. बाबू सिंग बासरीवाले. बलजीत सिंग बावरी. दलिप सिंग रागी. जीतसिंग दुकानदार. इंद्रजीत सिंग गडगंज. केहर सिंग  जगजीतसिंग खालसा, दलजीत सिंग हैद्राबाद, माजी नगरसेवक बाबुभाई खोकेवाले व हबीब बागवान यांनी सहभाग घेतला.

      शिख समाजाचा नेहमीच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे कल दिलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार व तीन खासदार असताना देखील सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उपोषण स्थळास भेट दिली नसल्याने आंदोलकर्त्यांमध्ये नाराजी पसरत आहे. राज्यसभेचे नवनियुक्त खासदार अजित गोपछडे व अशोकराव चव्हाण आज नांदेडमध्ये दाखल झाल्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या