🌟बालकांनी खिलाडूवृत्ती जोपासावी : वैभव वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी....!


🌟चाचा नेहरू बाल महोत्सवातील बक्षीस वितरण व समारोप प्रसंगी ते म्हणाले🌟 

✍🏻फुलचंद भगत

वाशिम :- महिला व बाल विकास विभाग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत दिनांक 07/02/2024 ते 09/02/2024 रोजी पर्यंत तीन दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून  श्री.वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वाशिम यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा बाल कल्याण समिती डॉ. अलकाताई मकासरे तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिन खरात, प्राचार्य नवोदय विद्यालय वाशिम, सुभाष लष्करे, उपप्राचार्य नवोदय विद्यालय,  वाशिम प्रियांका हरिश्चंद्र गवळी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बाल कल्याण समिती सदस्य एड अनिल उंडाळ, डॉ. मंजुश्री जांभरूनकर, बाल न्याय मंडळ सदस्य एड  प्रतिभा वैरागडे,  यांची उपस्थिती होती.

                 कार्यक्रमाचे प्रास्ताविकमध्ये प्रियांका गवळी यांनी केले.प्रास्ताविक मध्ये तीन दिवसीय घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले. वैभव वाघमारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या भाषणातून मुलांनी खिलाडूवृत्ती जोपासावी त्यासोबत शालेय अभ्यासात अग्रेसर व्हावे मुलांनी शैक्षणिक विकास साधावा तसेच खेळामध्ये आपल्या देशाचे नाव उज्वल करावे असे आव्हान केले. तसेच बालगृहातील बालकांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांनी चेंबरला बोलवून नाष्टा व शालोपयोगी साहित्याचे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.सचिन खरात प्राचार्य, एड अनिल उंडाळ, डॉ. मंजुश्री जांभरूनकर, बाल न्याय मंडळ सदस्य एड  प्रतिभा वैरागडे, यांनीही अल्प शब्दामध्ये मुलांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षकीय भाषणात डॉ. अलकाताई मकासरे  यांनी मोबाइल चा अतिरेक वापर टाळून अभ्यासावर  लक्ष केंद्रित करावे याबाबत मार्गदर्शन केले.  दिशा मुलींचे बालगृहातील विद्यार्थिनी ममता उगले हिने आपले मनोगत व्यक्त केले. 

सदर तीन दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सवामध्ये विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये मुलांनी  भरघोस प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, तसेच आभार प्रदर्शन धिरज उचित तालुका  संरक्षण  अधिकारी यांनी केले. चाचा नेहरू बाल महोत्सवामध्ये यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बाल विकास  अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी व कर्मचारी,  जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे, अभय केंद्र, जिल्हा संरक्षण अधिकारी तसेच तालुका संरक्षण अधिकारी, चाईल्ड लाईन, इश्यू संस्था,  कार्यालयाचे  अधिकारी व कर्मचारी तसेच शाळेचे शिक्षकवृंद, बालगृहाचे अधिक्षक व कर्मचारी, जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम चे शिक्षकवृंद यांचे विशेष सहकार्य लाभले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या