🌟गुरुजीकडे समाज स्वच्छ आरसा म्हणून पाहतो म्हणून जे पोटात तेच ओठात येत असते - नामदेवराव राजभोज

(उत्कृष्ट कार्याबद्दल अंबादास काळे कमलाबाई काळे यांचा सपत्निक  सत्कार करतांना उपस्थित मान्यवर )

🌟गौर येथील श्रीसोमेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात अंबादास काळे यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल आयोजित सोहळ्यात ते म्हणाले🌟  

पुर्णा : समाजातील सर्व स्तरातील व्यक्तीने स्पष्ट बोलले पाहीजे उडवा उडवीचे उत्तरे देवून आपली प्रतिमा मलिन करु नये गुरुजीकडे समाज स्वच्छ आरसा म्हणून पाहतो म्हणून जे पोटात तेच ओठात येत असते असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेवराव राजभोज यांनी व्यक्त केले . 

          गौर येथील श्री सोमेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात उत्कृष्ट कार्याबद्दल अंबादास काळे यांचा सेवागौरव कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव राजभोज बोलत होते .प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेवक दत्तात्रेय वाघमारे , विभागीय सचिव केशव अण्णा दुधाटे , डॉ. श्यामसुंदर सोनवणे , उपाध्यक्ष मनोहर पारवे , सचिव रंगनाथ पारवे ,सहसचिव केशव पारवे ,मारोती थडवे ,रामराव पारवे , गणपत दुथडे , नंदकुमार बोगळे , दिंगबर बिडवे , माणिक रेणके , विलास केंढे , तातेराव लहाने ,औंढा येथील गट विकास आधिकारी गोपाळ कल्हारे,प्रा.महेश पारवे अदीची प्रमुख उपस्थिती होती . 

         पुढे बोलतांना मुख्याध्यापक गोपाळ भुसारे म्हणतात जीवनात जेवढे मोठे व्हाल तेवढा कामाचा व्याप जनतेच्या अपेक्षा वाढतात म्हणून प्रामाणिकपणे भेदभाव न करता काम करणे म्हणजेच समाधान होय . कार्यक्रमात अंबादास काळे व पत्नी कमलाबाई काळे यांचा सपत्निक सत्कार करून मानचिह्न देण्यात आले . प्रसंगी माजी विद्यार्थी , तालुक्यातील मुख्याध्यापक संघटना , शिक्षक संघटना , विद्यालयातील शिक्षक कर्मचारी ,विविध विभागातील कर्मचारी बांधव उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर आंबेगावे  सूत्रसंचालन नवनाथ बोबडे , आभार प्रदर्शन भिमराव ढगे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या