🌟पुर्णेत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीपुरवठ्याची धुळधाण : नगर परिषद प्रशासन बोगस विकास कामांच्या नियोजनात बेभान....!


🌟शहरातील नागरिक मागील दहा/बारा दिवसांपासून पाण्यापासून वंचित : पर्यायी व्यवस्था करण्यात मुख्याधिकारी अपयशी🌟

🌟महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्याकडे शहरवासीयांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी🌟 


पुर्णा : पुर्णा नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पुर्णा-थुना नदीकाठावर बसलेल्या पुर्णा शहरातील नागरिकांना मागील दहा/बारा दिवसांपासून चक्क हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः दरदर भटकण्याची वेळ यावी यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती ? असा प्रश्न नगर परिषदेचे मुख्याधिकारी युवराज पौळ यांना विचारण्याची वेळ आता नागरिकांवर आल्याचे निदर्शनास येत असून येत असून शहरातील विविध प्रभागांसह काही निर्मनुष्य वसाहतींमध्ये देखील कोट्यावधी रुपयांची निकृष्ट विकासकामे 'डंके की चोट पर' चालू असून या निकृष्ट कामांवर यत्किंचितही पाण्याचा तुटवडा भासत नसतांना शहरातील नागरिकांवर मात्र दहा/बारा दिवसांपासून हंडाभर पाण्यासाठी अक्षरशः दरदर भटकण्याची वेळ नगर परिषदेच्या निष्क्रिय कारभारामुळे आल्याचे पाहावयास मिळत असल्याने पुर्णेत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीपुरवठ्याची धुळधाण अन् नगर परिषद प्रशासन बोगस विकास कामांच्या नियोजनात बेभान असा एकंदरीत कारभार नगर परिषद प्रशासनाचा झाल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरल्याचे दिसत असून शहरातील पाणीपुरवठा सुरळीत सुरुन शहरातील नागरिकांना वेळ पडल्यास टॅंकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्याकडे केली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गोविंद उर्फ राज ठाकर यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी मनसेचे शेख गौस,भारत बोबडे,पंकज राठोड यांनी मुख्याधिकारी युवराज पौळ यांची भेट घेऊन पुर्णा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीचे निवेदन दिले यावेळी मुख्याधिकारी पौळ यांनी मनसेच्या शिष्टमंडळास बोलतांना नगर परिषद प्रशासनातर्फे शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे दोन दिवसाच्या पाणीपुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिले आहे पुर्णा शहरातील पाणीपुरवठा मागील दहा-बारा दिवसांपासून खंडित झाला असतांना निकृष्ट विकासकामांना प्राथमिकता देणारे नगर परिषद मुख्याधिकारी पौळ मात्र जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहे मागील महिन्यात पूर्णा नदी पात्रातील कोल्हापुरी बांधाऱ्याचे लाखो रुपये खर्च करून काम केले आहे व निसर्गाच्या कृपेने नदीपात्रात पाणी जमा झाले परंतु प्रशासनाच्याच्या निष्काळजीपणामुळे जमा झालेले पाणी वाहून गेले उन्हाळ्याच्या सुरुवातीला अवघ्या एका महिन्यातच पुर्णा शहराला पाणी टंचाई सारख्या गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून अवघ्या दोन दिवसांवर 'शिवजयंती महोत्सव' आला असतांना या सणासुदीच्या काळात देखील पाण्याच्या गंभीर प्रश्नावर निष्क्रिय नगर परिषद प्रशासन तोडगा काढण्यासाठी कुठल्याही प्रकारची उपाय योजना करित नसल्यामुळे नागरीकांना व अबाल वृद्धांना पाण्यासाठी दरदर भटकावे लागत आहे किंवा हजारो रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत असल्याने मुख्याधिकारी युवराज पौळ यांना लवकरात लवकर पुर्णा शहरातील पाणी टंचाई सारख्या गंभीर प्रश्नावर उपाय योजना करुन पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे......



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या