🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी....!


🌟याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन🌟 

पुर्णा (दि.२३ फेब्रुवारी) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा यांची १४७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ प्रभाकर सूर्यवंशी यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.समाजातील अंधश्रद्धा वाईट रुढी परंपरा अस्वच्छता नष्ट व्हावी यासाठी ज्यांनी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची केले ते कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी यांनी विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा डॉ दीपमाला पाटोदे यांनी केले तर आभार केले तर विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी आभार मानले.या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या