🌟शिख समाजाचा प्रस्तावित गुरुद्वारा बोर्ड अधिनियमाला विरोध दर्शविन्यासाठी आंदोलन करणार....!


🌟राजकीय नेत्यांना गुरुद्वारात विशेष सन्मान सिरेपाव देण्यात येऊ नये अशी मागणी🌟

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या वतीने नुकतेच गुरुद्वारा सचखंड श्री हजुर साहिब बोर्ड कायद्याचे प्रारूप बदलण्याचे निर्णय पारित करण्यात आले होते. संबंधित नवीन अधिनियमास नांदेड येथील हजूरी साधसंगत तर्फे विरोध दर्शविण्यात आला असून 1956 कायदा पूर्ववत ठेवण्यात यावेत. असा निर्णय बुधवारी सायंकाळी गुरुद्वारा बाउली साहेब येथे पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष स. शेरसिंघ फौजी, माजी सचिव स. रविंद्रसिंघ बुंगाई, माजी सदस्य गुरमीतसिंघ महाजन, राजिंदरसिंघ पुजारी, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, अमरजीतसिंघ गिल, तेजसिंघ बावरी, महेंद्रसिंघ पैदल, जगदीपसिंघ नंबरदार, रविंद्रसिंघ मोदी, अवतारसिंघ पहरेदार, भागिन्दरसिंघ घडीसाज, जसपालसिंघ लांगरी, मनबीरसिंघ ग्रंथी, जरनैलसिंघ गाडीवाले, राजेंद्रसिंघ पुजारी, दीपकसिंघ गल्लीवाले, गुरमीतसिंघ बेदी, सत्येंदर सिंघ मुंबई, मनप्रीत सिंघ कारागीर, हरभजनसिंघ दीगवा, किरपालसिंघ हजुरिया, जसबीरसिंघ धूपिया, राजिंदरसिंघ शाहू, गुरप्रीतसिंघ सोखी, हरभजनसिंघ पुजारी, गुरदीपसिंघ संधू, दिलीपसिंघ रागी, इंदरजीतसिंघ, सरबजीतसिंघ, हरजीतसिंघ गिल, दीपसिंघ गाडीवाले, कुलप्रकाशसिंघ विष्णुपुरीकर, प्रेमज्योतसिंघ सह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.

वरील बैठकीत नवीन प्रस्तावित कायद्यास तीव्र निषेध करण्यात आले. नवीन कायद्या होऊ नये म्हणून शीख समाजाच्या वतीने धरना आणि चक्री उपोषण करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांची भेट घेऊन मागणी प्रस्तुत करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थितांनी निर्णय घेतला की जो पर्यंत कायदा रद्द होत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांना सीरेपाव देऊन सन्मान करू नये असे ही निर्णय घेण्यात आले. या बैठकित झालेल्या निर्णयाचे पत्र गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ विजय सतबीरसिंघ, मा. जिल्हाधिकारी साहेब, गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक यांना पाठविण्यात आले आहे.....

.........


फोटो : बुधवारी सायंकाळी गुरुद्वारा सचखंड बोर्ड अधीक्षक स. ठानसिंह बुंगाई यांना पत्र देतांना हजूरी सिख संगत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या