🌟वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे स्वराज्य सप्ताहा निमित्त रक्तदान शिबिर संपन्न.....!


🌟मुस्लिम युवकांनी रक्तदान करून दिला हिंदू मुस्लिम एकतेचा परिचय🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यातील जिल्हा व तालुका स्तरावर "राज्य रयतेचे-जिजाऊंच्या शिवबाचे दिनांक-१२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी पर्यन्त "स्वराज्य सप्ताहाच्या आयोजनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने दि.१७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा वाशिम व रायुका प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळे यांचे वतीने वाशिम जिल्हाध्यक्ष मो. युसुफ पुंजानी यांचे अध्यक्षतेखाली प्राथमिक आरोग्य केंद्र केनवड ता.रिसोड येथे स्वराज्य सप्ताह निमित्त भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन आले. शिबिरात शेकडो युवकांनी रक्तदान करून हिंदू मुस्लिम एकतेचा परिचय दिला

यावेळी रायुका प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रशांत गोळे, माजी जि.प सभापती जयकिसन राठोड, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा माधवीताई दत्तात्रय झनक, जिल्हा उपाध्यक्ष श्री राजू पाटील बाजड,आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर पाटील गोळे, दत्तात्रय झनक, मालेगाव तालुका कार्याध्यक्ष निलेश पाटिल कुटे, रिसोड तालुका कार्याध्यक्ष जिवन पाटिल वानखेडे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य हमीद शेख , अनील पाटिल काळे, गौस बेग, आझाद पठाण, अबिद पठाण, मुख्तार बेग, जावेद बेग जब्बार शाह मिर्झा जमीर, अनवर शाह चंदूभाई बागवान, शेख इस्राईल,भागवत, गोळे, समाधान गोळे, सतिश गोळे, पत्रकार फिरोजशाह, रामभाऊ वानखेडे, प्रभाकर नाईकवाडे, सोशल मीडिया कारंजा शहराध्यक्ष सै.  मुजाहिद, समीर पठाण सह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदान शिबिराकरिता वाशिम शासकीय रक्त केंद्र व शासकीय रक्तघटक विलगीकरण केंद्र जिल्हा रुग्णालय वाशिम चे सहकार्य लाभले.  यात डॉक्टर थोरात ,सचिन दंडे, संदीप मोरे ,आशिष इंगळे अक्षय नप्ते, पुरुषोत्तम चव्हाण या ब्लड कॅम्प टीमचे सहकार्य होते तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल इंगळे सह कर्मचाऱ्यांनी आपले योगदान दिले. आयोजित शिबिराला यशस्वी करण्यासाठी प्रा.प्रशांत गोळे मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या