🌟पुर्णेतील कम्युनिटी हॉल मागील स्टोअररुम म्हणून वापर होत असलेल्या जुन्या रेल्वे गार्ड/टिसी रनिंगरुमला भिषण आग.....!


🌟अग्निशमन दलाला पाचारण : अग्निशमन बंबाचा दोन वेळेस वापर केल्यानंतर आग आटोक्यात🌟


🌟फर्निचर बेडशीट गादींसह कागदपत्रे जळून खाक : मोठ्या प्रमाणात नुकसान🌟


पुर्णा (दि.२६ फेब्रुवारी) - पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे कम्युनिटी हॉलच्या मागील भागातील स्टोअररुम म्हणून वापर होत असलेल्या जुन्या रेल्वे गार्ड/टिसी रनिंगरुमला आज सोमवार दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ०८-०० ते ०९-०० वाजेच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना काही जागृक नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पुर्णा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला दिल्याने अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दलाच्या वाहनातील पाणी संपल्यानंतर देखील आग आटोक्यात येत नसल्यामुळे पुन्हा वाहणात पाणीसाठा भरुन आणण्यात आला बऱ्याच प्रयत्नानंतर कुठं आग आटोक्यात आली दरम्यान क्र्यु-बुकींग लॉबी नांदेड येथे स्थलांतरित करण्यात आल्यानंतर या जुन्या रनिंगरुम अर्थात विश्रामगृहाचा स्टोअररुम म्हणून वापर होत असल्याने यातील बेडशीट/गाद्यांसह फर्निचर साहित्य तसेच कागदपत्रे देखील अक्षरशः जळून खाक झाली.


पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानक परिसरातील कम्युनिटी हॉल मागील स्टोअररुमला आग नेमकी कोणत्या कारणाने लागली की लावली गेली याचा सखोल तपास करण्याची सर्वस्वी जबाबदारी आता रेल्वे सुरक्षा यंत्रणांवर आलेली आहे दरम्यान पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षा यंत्रणांच्या कमकुवतेमुळे मागील अनेक दिवसांपासून रेल्वे मालमत्ता चोऱ्यांच्या घटनांसह रेल्वे डिझेल चोरी तसेच भंगार चोऱ्यांच्या देखील घटना होतांना दिसून येत आहे एकंदर या सर्व घटनांना दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अधिकाऱ्यांचे अकार्यक्षम धोरणं देखील जवाबदार असल्याचे बोलले जात आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या