🌟महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनल्या व कारभारीन झाल्या.....!


🌟जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे प्रतिपादन : माविमच्या कार्याचे केले कौतुक🌟


परभणी :  महिला आत्मनिर्भर होत असताना दिसून येत आहे . महिलानी विविध शासकिय योजनेचे  लाभ घ्यावा. महिला बचत करण्यात नेहमी पुढे राहिल्या आहेत.  बँक कर्ज परतफेडीचे प्रमाण 99.9 % आहे हे खरच खूप कौतुकास्पद असून माविमच्या माध्यमातून महिला  स्वावलंबी बनल्या व कारभारीन झाल्या असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले.


महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा कार्यालय परभणी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत ८ लोकसंचलित साधन केंद्रमार्फत स्वयं सहय्यता महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू व मालाचे भव्य विक्री प्रदर्शनाचे आयोजन २७ फेब्रूवारी ते दि. १ मार्च या कालावधीत परभणी क्लब परभणी ( सिटी क्लब ) स्टेशन रोड, परभणी येथे आयोजित करण्यात आले आहे.  


यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी,नाबार्ड सहा.महाप्रबंधक एस.के.नवसारे,सुनिल हटेकर,विभगीय व मूल्यमापन अधिकारी संदीप मराठे, विभागीय उपजीविका सलागर माविम उत्कर्ष भोळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. आरती  गीते, अन्न व औषध प्रशासन व्यवस्थापाक अरूण तामटकर, सुरेश पवार, जिल्हा समन्वय अधिकारी माविम बाळासाहेब झिंजाडे मनीषा क्षीरसागर, किरण राठोड यांची उपस्थिती  होती यावेळी १६ बचत गटांना १ कोटी ३५ लाख रुपयाचे कर्ज वितरण करण्यात आले. यशस्वी उद्योजक महीलाचा सन्मान करण्यात आला.  आठ लोक संचलीत साधन केंद्राचे सत्कार करण्यात आले.  प्रदर्शनामध्ये एकुण २१२  महीला बचत गटाचे स्टॉल लावण्यात  आले होते. 

   पोलिस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी म्हणाले की,जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उधार करी. महिलांनी लक्ष्मीमुक्ती योजना, घर दोघांचे अभियांनातर्गत  सर्व महिलांनी  आपले नाव नोंदणी करावी . मविमचे कार्य खरच खूप मोठे असून त्यांच्या कार्य खूप कौतुकास्पद आहे. महिलांनी उत्पादित केलेले  वस्तू व  माल  चागल्या प्रतीचे आसून  त्यांनी पॅकेजिंग  व ब्रॅण्डिंग  करून मॉल सोबत व विवध व्यापारी याच्या सोबत करार करावेत बाळासाहेब झिंजाडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर सूत्रसंचालन जयश्री टेहरे,अभिमन्यू भोसले यांनी केले तर आभार भावना कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिवराज राऊत, विनय कुंभार सर्व लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक , लेखापाल, सहयोगीनी, सी. आर.पी. यांनी परिश्रम घेतले.......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या