🌟परभणी येथील पाटील मल्टि सुपरस्पेशालिटीचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत समावेश....!


🌟या रुग्णालयाचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या नामिका सूचित समावेश : कक्ष प्रमुखांकडून रुग्णालयास निवडीचे पत्र🌟

परभणी (दि.13 फेब्रुवारी) : परभणी येथील डॉ.प्रफुल्ल पाटील मल्टि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि. या रुग्णालयाचा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या नामिका सूचित समावेश करण्यात आला आहे.

        मुख्यमंत्र्याच्या सचिवालयातील वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी या निवडी संदर्भातील लेखी तपशीलवार पत्र या रुग्णालयाच्या विश्‍वस्त व संचालकांना मंगळवार 13 फेबु्रवारी रोजी पाठविले आहे. त्याद्वारे हे रुग्णालय महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व शासकीय योजने अंतर्गत नोंदणीकृत आहे. आता आपले रुग्णालय नव्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या नामिका सूचित समाविष्ट करण्यात येत आहे, असेही नमूद केले. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या ज्या आजारावरील उपचार, शस्त्रक्रियेसाठी आपले रुग्णालय नोंदणीकृत आहे, त्या आजारावरील उपचार हे संपूर्णतः योजनेतून करणे अपेक्षित आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमधील आजारांव्यतिरिक्त आजार हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी निकषांमधील आजार असल्यासच रुग्णांना रुग्णालयाच्या लेटर हेडवर सोबर जोडलेले विहित नमून्यातील वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक देण्यात यावे, असे सूचविले आहे.

         आपल्या रुग्णालयात जनरल व खाजगी किंवा युनिट 1 व युनिट 2 अशी काही विभागणी असल्यास जे युनिट योजनेमध्ये अंतर्भूत असेल, त्या युनिटमध्येच रुग्णांना उपचार द्यावयाचे आहेत व त्यांच्या वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक या सचिवालयास सादर करावयाचे आहे, असेही नमूद केले. तसेच या योजनंतर्गत अटी व शर्तीही त्यात समाविष्ट केल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या