🌟सामाजिक कार्यकर्ते संदीप चौंडे यांच्या वतीने गोशाळेतील जनावरांना चाऱ्याची सोय....!


🌟दुष्काळाच्या झळा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाल्याने माणसांबरोबर जनावरांचेही हाल सुरू🌟 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप चौंडे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गोशाळेस चारा उपलब्ध करून दिला. 

           दुष्काळाच्या झळा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाल्याने माणसांबरोबर जनावरांचेही हाल सुरू झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी पातळी खाली गेल्याने विहिरी आटू लागल्या आहेत. यातच जनावरांना पाण्याबरोबर चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. माणसे कुठेतरी जाऊन आपली व्यवस्था करू शकतात. परंतु मुक्या जनावरांचे हाल सुरू झाले आहेत. याची जाणीव ठेवून परळीतील संवेदनशील कार्यकर्ते संदीप चौंडे यांनी रामरक्षा गोशाळेतील गायींना चारा पोच केला. गोशाळेतील शेकडो गायी गोप्रेमी लोकांच्या दान स्वरूप मिळणाऱ्या चाऱ्यावर चालत असतात. संदीप चौंडे यांना या गायीच्या चाऱ्याची अडचण कळताच त्वरित कडबा पोचवल्याबद्दल रामरक्षा गोशाळेतर्फे संदीप चौंडे यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला. यावेळी रमेश चौंडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या