🌟वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलात उद्या दि.११ फेब्रुवारी पासून सलग तीन दिवस ‘जाणता राजा’ महानाट्य प्रयोग.....!


🌟‘जाणता राजा’ महानाट्याची तयारी पूर्ण🌟


फुलचंद भगत

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आजपासून ‘जाणता राजा’ या महानाट्य प्रयोगाला सुरुवात होणार आहे. हा नाट्य प्रयोग सलग तीन दिवस दि. ११ व १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सादर करण्यात येणार आहे

‘जाणता राजा’ या महानाटयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चारित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती सर्वसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित त्यांचे विचार ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या माध्यमातून जनमानसात पोहचविण्यात येणार आहे. यासाठी शंभरहून अधिक कलावंत सादरीकरण करणार आहे.


हे महानाटय सलग ३ तास १० मिनिटांचे आहे. ८ हजार २०० प्रेक्षक क्षमता प्रत्येक प्रयोगाची आहे. तीनही दिवसांचे महानाट्याचे प्रयोग मोफत आहे. मात्र प्रेक्षकांकडे महानाट्य बघण्याकरीता प्रवेशिका असणे अनिवार्य राहणार आहे. मोफत प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणि तालुक्याच्या ठिकाणी तहसिल कार्यालय येथे या प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विविध संघटनांनी महानाट्य प्रयोग बघण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुक्याच्या विविध संघटनांनी मोफत प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी तहसिल कार्यालय येथे संपर्क साधावा. प्रवेशिका असल्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या