🌟स्वकर्तृत्वाने यशस्वी झालेल्या यशवंतांचा शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा विधीज्ञ ॲड.राजेश भालेराव यांनी केला सन्मान...!


🌟 पुर्णेतील तिन यशवंतांनी जिद्द चिकाटी आणि बुध्दीमत्तेच्या बळावर शिक्षक पदापर्यंतच्या यशास घातली गवसणी 🌟

पुर्णा : पुर्णा शहरातील ओमकार नारायणराव पळसकर,शुभम शिवराज अप्पा बिबेकर,अभिजीत स्वामी या तिन युवकांनी आपल्यातील जिद्द चिकाटी आणि बुध्दीमत्तेच्या बळावर शिक्षक पदापर्यंत मजल गाठत यशाच्या शिखरावर गवसणी घातल्याने अश्या यशवंताच्या कर्तृत्वाचा कुठेतरी सन्मान व्हावा या दृष्टीकोनातून पुर्णा नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा कर्तृत्ववान विधीज्ञ ॲड.राजेश विष्णूकांत भालेराव यांनी या यशवंतांचा आपल्या कार्यालयात बोलावून हृदयस्पर्शी सन्मान करुन त्यांच्यातील कर्तृत्वाला प्रोत्साहन दिले.

यावेळी नगरसेवक तथा विधीज्ञ ॲड राजेश भालेराव यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कुटुंबाला देखील हार्दिक शतशः शुभेच्छा दिल्या 'यशाची शिखरे पार करून इतर तरुणांसाठी त्यांनी एकप्रकारे आदर्श निर्माण केला त्याबद्दल देखील त्यांचे ॲड.राजेश भालेराव यांनी मनभर कौतुक केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या