🌟स्वतःच्या जीवाला जपा संस्कृतीची नाळ जपा जगण सुंदर होईल : कृषी विभाग मुंबईचे अप्पर सचिव अनुप कुमार यांचे प्रतिपादन....!


🌟कडधान्य व तेलबिया या विषयावर एक दिवसीय कार्यशाळे प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते वेळी ते म्हणाले🌟 

परभणी/पुर्णा : दररोजच्या आहारात कडधान्य व भरडधान्याचा उपयोग आजी आजोबा करत होते म्हणून १०० वर्षे मेडीकलवरील गोळी न घेता जगले आज किती वर्षे कोण जगेल याचा विस्वास नाही गोळी खाल्याशिवाय झोप लागत नाही खाल्लेले अन्न पचन होत नाही म्हणून स्वतःच्या जीवाला जपा संस्कृतीची नाळ जपा जगण सुंदर होईल असे आवाहन कृषी विभाग मुंबईचे अप्पर सचिव अनुप कुमार यांनी केले. 

        कृषी आयुक्तालय पुणे येथे कडधान्य व तेलबिया या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यामधून प्रत्येक जिल्ह्यातून कडधान्यावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अप्पर सचिव कृषी  विभाग मुंबई  अनुप कुमार अध्यक्षस्थानी बोलत होते या कार्यक्रमाला डॉ आयुक्त प्रवीण गेडाम महाराष्ट्र राज्य पुणे, महाराष्ट्र कृषी संचालक डॉ.दिलीप झेंडे ,कृषी सहसंचालक सुनील बोरकर, कृषी सहसंचालक संभाजीनगर तुकाराम मोटे,जिल्हाधिकारी रायगड उज्वला बनवले ,  प्रगतिशील शेतकरी प्रकाश पाटील परभणीतील  प्रगतिशील शेतकरी मंगेश देशमुख ,जनार्धन आवरगंड नांदेड जिल्ह्यातील रत्नाकर ढगे आधीची उपस्थिती होती.   

      कार्यक्रमामध्ये कडधान्य  तेलबिया मनुष्य जीवनासाठी किती महत्वाचे आहे याची जानीव व्हावी यातून अनेक शेतकरी प्रोत्साहीत होतील यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . रत्नाकर ढगे, जनार्धन आवरगंड यांनी आपल्या शेतातील राजगिराचे उत्पादित केलेले कणीस  घरी बनवलेले आंबा लोणचे सुपारी  देऊन कृषी सचिव अनुप कुमार साहेबांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रसिद्धी पत्रक देऊन सन्मानित  करण्यात आले . या कार्यक्रमांमधून मिलेट वर शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेतल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी साठी काही  प्रश्न उपस्थित करण्यात आले बायोगॅस सारखी उत्कृष्ट योजना, छोटे-मोठे गृह उद्योग , बँकशी  निगडित आहेत आणि बरेचसे अटी शर्ती घातल्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे अशा बऱ्याचशा प्रश्नावर चर्चा पण करण्यात आली त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना पण दिल्या आणि शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सत्र झाले  त्यावर सविस्तर असे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्याचे आश्वासन सचिव यांनी  केले  त्यांनी एक अनमोल असा सल्ला दिला की शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल या विषयावर जास्तीत जास्त काम केले पाहिजे परभणी जिल्ह्यातून मला त्यांच्याशी चर्चा करण्याचा जजो  योग आला त्यामुळे कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधिकारी रवी हरणे यांनी विविध शेतकरी बांधवांना प्रोत्साहीत केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ .दिलिप झेंडे यांनी केले सूत्रसंचालन व   आभारप्रदर्शन सुनिल बोरकर यांनी मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या