🌟महाराष्ट्र सरकारने सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादलेल्या नवीन कायद्या विरोधातील साखळी उपोषणाचा आज ०६ वा दिवस...!


🌟नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण/निदर्शन करणाऱ्या सिख समुदायाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष🌟

नांदेड (दि.१४ फेब्रुवारी) - महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या जुन्या गुरुद्वारा ॲक्ट १९५६ या कायद्यात संशोधन करुन नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम-२०२४ हा सिख धर्मियांच्या मुलभूत धार्मिक बाबींमध्ये सरळसरळ हस्तक्षेप करणारा काळा कायदा संमत करून पवित्र तख्त सचखंड गुरुद्वाऱ्यावर लादला जात असल्याने त्या विरोधामध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील ०९ फेब्रुवारी २०२४ पासून सिख समुदायाकडून साखळी उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे लोकशाही पद्धतीने आपल्या न्यानिक मागणीसाठी साखळी उपोषणाचा मागील ०६ दिवसांपासून साखळी उपोषण/निदर्शन करणाऱ्या आंदोलनकर्त्यां सिख समुदायाकडे नांदेड जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत असून या साखळी उपोषणाची जिल्हा प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली नसल्याने प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. 

     जागतिक ख्यात कीर्तीचे सचखंड गुरुद्वारा नांदेडच्या व्यवस्थापनासाठी अस्तित्वात असलेला गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट १९५६ हा कायदा बदलून राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन गुरुद्वारा बोर्ड अधिनियम २०२४ हा कायदा संमत केला आहे या कायद्याला सर्व शीख धर्मीयांचा देशभरातून विरोध होत आहे याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.०९ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज ०६ वा दिवस असून आज चक्री उपोषणात स.संतसिंघ संधू,स.रणजीतसिंघ चिरागियास.रतनसिंघ तिरकुटवाले,स.भूपिंदर सिंघ कापसे,स.गुरमीत सिंघ बेदी,स.मनिनन्दर सिंघ रामगडीया यानी सहभाग नोंदवला असून त्यांच्या या साखळी उपोषणाला,स.राजिन्दरसिंघ पुजारी,स.मनप्रीत सिंघ कुंजीवाले,स.रविन्दरसिंघ बुंगई,स.मनप्रीतसिंघ कारागीर,स.शेर सिंघ फौजी,स.गुरमीतसिंघ महाजन,स.जगदीपसिंघ नम्बरदार,स.सबरजीतसिंघ होटलवाले,स.मनबीरसिंघ ग्रंथी,स.अवतारसिंघ पहरेदार,स.मंजीतसिंघ करीमनगर,स.दिपकसिंघ गल्लीवाले,स.महलसिंघ लांगरी,स.जसपालसिंघ लांगरी,स.जसबीरसिंघ बुंगई,स.प्रेमजीतसिंघ शिलेदार,स.रविन्दरसिंघ पुजारी,स.करणसिंघ लोनीवाले,स.हरभजनसिंघ पुजारी,स.हरभजनसिंघ दिगवा,स.भोलासिंघ गाड़ीवाले,स.भोलासिंघ दरोगा,स.लकीसिंघ दफेदार,स.दिपक सिंघ हजूरिया,स.बिरेंद्रसिंघ बेदी,स.जगजीतसिंघ खालसा,स.सरबजीतसिंघ बेदी,स.महेन्दरसिंघ पैदल आदींसह नागपुर सिख संगत गुरद्वारा गुरु नानक दरबारचे अध्यक्ष स.परविंदर सिंघ विज,उपाध्यक्ष स.गुरपाल सिंघ माखन,सचिव स.हरदीप सिंघ सोढ़ी,स.जगजीत सिंघ चव्हाण,स.जसपाल सिंघ व पंजाब लुधियाना हुन किसान युवा व बाबा मोहन सिंघ हंसली साहेब वाले यानी भेट देवून जाहिर पाठिंबा दर्शविला असून आज बुधवारी या साखळी उपोषणाला सहा दिवसांचा कालावधी लोटला असला तरीही जिल्हा प्रशासनाने या साखळी उपोषणाची कोणतीही दखल घेऊन कारवाई करण्याचे टाळले आहे. या साखळी उपोषणाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत असून यामध्ये जिल्ह्याचे दिग्गज लोकप्रतिनिधी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दर्शविला असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या