🌟शेतकऱ्यांचे आणी हमालांचे संरक्षण हिसकाऊ नका - डाॅ.हरिष धुरट


🌟अशी मागणी वाशिम जिल्हा कामगार मेळाव्यात करण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ हरीश धुरट होते🌟             


 
वाशिम:-महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी व ईतर श्रमजीवी अधिनियम सुधारणेच्या नावाखाली विधानसभा विधेयक ३४ व महाराष्ट्र कृषी उत्पन्न अधिनियम यातील सुधारणा विधेयक ६४ मागे घेण्यात यावी अशी मागणी वाशिम जिल्हा कामगार मेळाव्यात करण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ हरीश धुरट होते. 

ते आपल्या भाषणात म्हणाले ,सरकार शेतकरी व माथाडी कामगारांना ओसाड पठारावर ढकलत आहेत. सरकारला संरक्षण देता येत नसेल तर ते हिसकावून सुध्दा घेऊ नये असे यावेळी त्यांनी म्हटले. कार्यक्रमाचे आयोजन कारंजा कृउबा समितीचे संचालक हसन चौधरी यांनी केले होते. 

शेतकरी व हमाल यांच्या मेंदूमधील राग व पोटातली आग सरकार चेतवत व पेटवत असेल तर सरकारवर नांगर व हूक फिरविल्याशिवाय राहणार नाही. यावेळी अकोल्याचे शेख हसन कादरी यांनी माथाडी व शेतकऱ्यांना लुटण्याचे उदाहरण स्पष्ट केले. अडते शेतकऱ्यांचा मालाच्या किमती वर कमीशन घेते, व्यापारी मालाच्या वाटेवर लुट करते तर हमालांना नगावर पैसे मिळते. याबाबत खुलासा करतांना म्हणाले, शेतमाल दोन हजार रुपये क्विंटल असेल तर कमिशन अडत्याला शंभर रुपये,व्यापा-याला २०००रुपयाच्या मागे ४२०० रुपये तर हमालांना एका नगावर आठ ते दहा रुपये मिळतात. सध्या बाजारात गहू २२०० रूपये क्विंटल आहे तोच गहू दुकानात ४२००ते ४४०० रुपये आहे. ही कष्टकरी शोषणाची साखळी तोडण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे काटेकोर पाळले पाहिजे. असे कादरी म्हणाले. 

कृउबा चे विधेयक ६४ व माथाडीचे विधेयक ३४सरकारने मागे घ्यावे यासाठी डॉ. बाबा आढाव २६फेब्रुवारी २०२४ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या सोबतीला राज्यातील माथाडी कामगारांनी ठिकठिकाणी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

कारंजा लाड येथे पार पडलेल्या मेळाव्यात हिंगोलीचे हाजी बुराण, आर्वी बाजार समितीचे संचालक दिलीप भुसारी, मंगरूळ पीर कृउबा समितीचे संचालक शेख जंगलू मुन्नीवाले, खन्नुभाई नंदावाले, मुर्तिजापूर बाजार समितीचे संचालक मुजाहिद कयूम,कयूमशेख मेहबूब, वाशिम बाजार समितीचे संचालक हिराभाई जानीवाले,मानोरा कृउबा समितीचे संचालक शेख अनिस शेख नतीम यांनी सरकारच्या धोरणावर जिल्ह्यात निषेध व्यक्त केला.....


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या