🌟परभणी जिल्ह्यातील सेलू येथे टेनिस हॉलीबॉल व फ्लॉवरबॉल क्रीडा स्पर्धांना प्रारंभ.....!


🌟स्पर्धत विविध जिल्ह्यातील 72 संघात 650 खेळाडूचा सहभाग🌟

परभणी/सेलू (दि.10 फेब्रुवारी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व नूतन विद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नूतन विद्यालयाच्या क्रिडांगणात आयोजित केलेल्या शालेय राज्यस्तरीय टेनिस हॉलीबॉल व फ्लॉवरबॉल क्रीडा स्पर्धांना शनिवार 10 फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला.

       स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सेलू नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. सत्यनारायणजी लोया तर प्रमुख उपस्थितीमध्ये टेनिस हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड, राज्य सचिव रवींद्र चौथवे, नूतन विद्यालय संस्था सचिव डॉ. विनायक कोठेकर,  संदीप लहाने,  दत्तराव पावडे,  प्रभाकर सुरवसे, मिलिंद सावंत, रामेश्‍वर कोरडे, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांना 650 खेळाडूंनी मार्च पास करून मानवंदना दिली.  याप्रसंगी योगासनपटुंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून महाराष्ट्र राज्यातील खेळाडूंचे मने जिंकली.

         शालेय राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल व फ्लोअरबॉल स्पर्धेसाठी वयोगट 14, 17 आणि 19 वर्षाखालील मुला - मुलींचे संघ 72 संघातील 650 खेळाडूचा सहभाग असून अमरावती, छत्रपती संभाजीनगर, पुणे, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नाशिक, मुंबई या विभागातून खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील, सूत्रसंचालन गोपाल आम्ले तर आभार प्रदर्शन प्रशांत नाईक यांनी केले. नूतन विद्यालय क्रीडा विभाग प्रमुख तथा राज्य सचिव गणेश माळवे, पर्यवेक्षक डी.डी. सोन्नेकर, के. के. देशपांडे टेनिस हॉलीबॉल परभणी जिल्हा सचिव सतीश नावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय भुमकर, किशोर ढोके, नागेश कान्हेकर, संध्या फुलपगार, रूपाली लाडाने, प्रतिज्ञा चव्हाण, कीर्ती राऊत, यमुना चव्हाण, संध्या आमटे, माधुरी कुंभार, अमृता नरके, ज्योती बिरादार, सुरेखा भांबळे, सुजाता रासवे, रूपाली चव्हाण, मनोज वाघमारे, नंदकिशोर चव्हाण, बाबासाहेब गोरे आदी प्रयत्नशील आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या