🌟वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे विदर्भस्तरिय भव्य खंजेरी भजन स्पर्धा....!


🌟शहरातील बिरबलनाथ मंदीरात आज शुक्रवार दि.१ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता स्पर्धेचे आयोजन🌟 

वाशिम:-श्री संत अच्युत महाराज भजनी मंडळ व श्री गुरुदेव सेवा मंडळ मंगरुळपीर यांचे वतिने सिद्धयोगी तपस्वी संत श्री बिरबलनाथ महाराज यांचा यात्रोत्सवानिमित्त वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिखित खंजेरी भजनांची स्पर्धा बिरबलनाथ मंदीरात दि.१ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे व कृ.उ.बा.स.संचालक विठ्ठलराव गावंडे यांचे विशेष उपस्थितीत होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वाशिम-यवतमाळ मतदार संघाचे समन्वयक राजू पाटील राजे यांची तर उदघाटक म्हणुन कृ.उ.बा.स.मंगरुळनाथ तथा वाशिम जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, संस्थानचे सचिव रामकुमार रघुवंशी यांची उपस्थिती राहणार आहे.भजन स्पर्धेला सामुदायिक प्रार्थने नंतर लगेचच सुरुवात होईल.स्पर्धेतील विजयी भजनी मंडळासाठी आकर्षक बक्षिसांची तरतुद आयोजकांकडुन करण्यात आली आहे.

प्रथम बक्षीस १५ हजार रुपये,द्वितीय १३ हजार रुपयू,तृतिय ११ हजार रुपये,चतुर्थ १०हजार रुपये,पाचवे ८ हजार रुपये,सहावे ७ हजार रुपये,सातवे ६ हजार रुपये आठवे ५हजार रुपये,नववे ४ हजार ५०० रुपये,दहावे ४हजार रुपये,अकरावे ३हजार ५०० रुपये,बारावे ३ हजार रुपये,तेरावे २हजार ९०० रुपये,चौदावे २ हजार ८०० रुपये,पंधरावे २ हजार ७०० रुपये,सोळावे २ हजार ६०० रुपये,सतरावे २ हजार ५०० रुपये,अठरावे २ हजार ४०० रुपये,एकोणीसावे २ हजार ३०० रुपये,विसावे २ हजार २०० रुपये,एकविसावे २ हजार १०० रुपये अशी एकवीस बक्षीसे क्रमवार विजेत्या भजनी मंडळांना देण्यात येणार आहेत.स्पर्धेत भाग घेणार्‍या भजनी मंडळांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एकुण ५ भजने म्हणावी लागणार आहे.मागील वर्षी म्हटलेले भजन याृ वर्षी म्हणता येणार नाही.नाही म्हटल्यास १० गुण कपात होतील.स्पर्धकाला एकाच भजन मंडळात भाग घेता येईल.भजनी मंडळास स्वर,ताल,शब्दोच्चार,साथ संगत,भजन प्रभाव या विषयावर गुण दिले जाणार असून बाल व महीला भजनी मंडळास याच अटीवर गुणांकन केले जाईल.पाच कडव्याचे भजन पाहुन म्हणण्याची व स्थानिक भजनी मंडळास भाग घेण्याची सवलत आयोजकाकडुन देण्यात आली आहे.

परिक्षकांचा निर्णय अंतीम राहील.भजनाच्या याद्या सुवाच्च अक्षरात फाईल मध्ये देणे बंधन कारक आहे.दि.१ मार्च रोजी १२ वाजे पर्यंत भजनी मंडळाची आभासी नोंदणी केल्यास पाच गुण बोनस दिल्या जाईल.विजेत्या भजनी मंडळांना बक्षिस प्रायोजकांच्षा हस्तें बक्षीर वितरण करण्यात येतील.तरी आयोजित भजन स्पर्धेत भजनी मंडळांनी आवर्जून भाग घ्यावा असे आवाहन संत अच्युत महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष बाळु उर्फ रामकृष्ण पाटील वकटे यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या यशस्विते साठी विरेंद्रसिंह ठाकुर श्याम खोडे,रविंद्र वार्डेकर,जयंत जहागीरदार,गजानन गिर्डेकर,बाळु दिवेकर,सिताराम महाराज,गोपाल क्षीरसागर,सुधाकर क्षीरसागर सह नाथ नगरीतील समस्त गुरुदेवप्रेमी प्रयत्नशील आहेत.....

✍🏻फुलचंद भगत-मंगरुळपीर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या