🌟लातूर येथील विभागीयस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन.....!


🌟या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य विकास आडे यांनी केले🌟

परभणी (दि.20 फेब्रुवारी) : सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर व मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर यांचे संयुक्त विद्यमानाने (दि. 24) रोजी लातूर येथे विभागीयस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरी जिल्ह्यातील आजी व माजी प्रशिक्षणार्थ्यांनी लातूर येथील विभागीयस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य विकास आडे यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या