🌟आवास योजनेचे उद्दीष्ट व प्रोत्साहन रक्कम वाढवा अन्यथा आमरण ऊपोषण....!


🌟मा.सरपंच शेखर भगत यांचा प्रशासनाला लेखी निवेदनाव्दारे इशारा🌟

फुलचंद भगत

वाशिम:-रमाई/शबरी/पीएम आवास/मोदी आवास व इतर आवास योजना अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील सर्व गांवाचे उद्दिष्ट व प्रोत्साहन रक्कम वाढवून मिळावे अन्यथा आमरण ऊपोषणास सुरुवात करणार असल्याचा इशारा चंद्रशेखर प्रमोद भगत, माजी सरंपच, ग्रा.पं. कवठळ ता. मंगरुळपीर जि. वाशिम यांनी प्रशासनाला लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.


  शासनाने रमाई/शबरी / पीएम आवास/मोदी आवास योजना व इतर आवास योजना अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यामध्ये घरकुलांचे गांवनिहाय उद्दिष्ट देण्यात आलेले आहेत. परंतु सदर उद्दिष्ट कमी आहेत. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे.तरी मंगरुळपीर तालुक्यातील सर्व प्रकारच्या घरकुल योजनांचे उद्दिष्टांमध्ये वाढ करण्यात यावी तसेच प्रोत्साहन पर अनुदान अत्यंत कमी असल्यामुळे गरीबांना उरलेल्या रक्कमेची व्यवस्था करण्याकरीता कर्जबाजारी व्हावे लागत आहे. तरी सदर प्रोत्साहनपर रक्कम वाढवून ग्रामिण भागाप्रमाणे कमीत कमी २,४०,०००/- करण्यात यावी.सदर निवेदनाचा तातडीने विचार करण्यात येऊन १० दिवसांचे आत कार्यवाही करण्यात यावी अन्यथा या बाबत तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा लेखी निवेदनाव्दारे मा.सरपंच शेखर भगत यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.....

प्रतिनीधी :- फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या