🌟सचखंड गुरुद्वाराचे पंचप्यारे साहेबांच्या ठरावाची माहिती शासनाला देण्यास दिरंगाईमुळे नवीन वादग्रस्त कायदा झाल्याचा आरोप...!


🌟गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक व संबंधित बेजबाबदार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी🌟


नांदेड (दि.१० फेब्रुवारी) - गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट 1956 मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात येऊ नये याबाबत पंचप्यारें साहेबांनी बोर्डाच्या अधिकृत बैठकीमध्ये घेतलेल्या ठरावाची माहिती राज्य शासनाला वेळेवर पाठविण्यात आली नसल्याने दिरंगाईसाठी जबाबदार असलेल्या बोर्ड अधीक्षक व जबाबदार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची  कडक कारवाई करण्याची मागणी शिख समाजाच्यावतीने गुरुद्वारा बोर्ड प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंग यांना केली आली आहे.

      गुरुद्वारा बोर्ड 1956 मधील कलम 11 मध्ये सुधारणा करीत राज्य शासन नियुक्त अध्यक्ष करण्याची तरतूद करण्यात आली होती. या तरतुदीच्या विरोधामध्ये गुरुद्वारा बोर्डाच्या अधिकृत बैठकीमध्ये पंचप्यारे साहेबांच्या उपस्थितीत दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी गुरुमत्ता (ठराव) पास करण्यात आला होता. या ठरावाची माहिती राज्य शासनाकडे तात्काळ पाठविण्याची जबाबदारी गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक व कमिटीच्या कर्मचाऱ्यांची होती. परंतु सदर ठरावची माहिती राज्य शासनाला दि. 7 फेबु 2024 रोजी उशीराने देण्यात आली. त्यामुळे राज्य  मंत्रिमंडळाच्या सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2024 च्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सचखंड गुरुद्वारा अधिनियम 2024 चा निर्णय घेण्यात आला आहे. 

     गुरुद्वारा बोर्ड कमिटीच्या बैठकीमध्ये पंचप्यारे साहेबांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेला ठरावची माहिती राज्य शासनाला  वेळेमध्ये दिली गेली नाही.  त्यामुळे गुरुद्वारा बोर्ड अधिनियम 2024 चा निर्णय झाला असल्याचा आरोप करीत शिख समाजाच्यावतीने गुरुमत्ता (ठरावाची ) प्रत पाठवण्यास दिरंगाई करणाऱ्या गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक व त्यांचे संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी प्रशासक विजय सतबिरसिंग यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर मनमोहनसिंग कुणाल नंबरदार, सरताजसिंग सुखमणी, सुखासिंग, विक्रमजीतसिंग,सरबरज्योतसिंग,अमनदीपसिंग, पवितसिंग पुजारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या