🌟पुर्णेतील अभिनव विद्या विहार शाळेतील विद्यार्थीनी आराध्याने आपले आराध्य दैवत शिवरायांना केले रांगोळीतून अभिवादन....!


🌟आराध्या सुरेश लोखंडे या विद्यार्थिनीने रांगोळीतून साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर छायाचित्र🌟 


पुर्णा (दि.१९ फेब्रुवारी) - महाराष्ट्राचे आराध्य दैवत 'जानता राजा' बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सर्वत्र विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी केली जात असतांना पुर्णेतील अभिनव विहार शाळेतील विद्यार्थ्यांनी कु.आराध्या सुरेश लोखंडे हिने आपल्या रांगोळी कलेच्या माध्यमातून 'जानता राजा' छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर छायाचित्र काढून आपल्या लाडक्या आराध्य दैवताला अभिवादन केले.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना रांगोळी कलेच्या माध्यमातून कु.आराध्याने केलेले अभिवादन अत्यंत कौतुकास्पद म्हणावें लागेल आराध्याने रांगोळीतून साकारलेली छत्रपती शिवरायांची प्रतिमा तिच्यातील कलाकौशल्याची तमाम शिवभक्तांसह पुर्णेकरांना जाणीव करुन देत असून कु.आराध्याचे लोखंडे हिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या