🌟जळगाव-भुसावळ महामार्गावर वाळू तस्करांच्या विरोधात कारवाई करणार्‍या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्‍यांवर गुंडांचा हल्ला....!


🌟परभणीत तहसीलदार संघटनेने केला त्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध🌟

परभणी (दि.०७ फेब्रुवारी) :  जळगाव-भुसावळ महामार्गावर वाळू तस्करांच्या विरोधात कारवाई करणार्‍या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्‍यांवर काही गुंडांनी रॉडने केलेल्या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने निषेध केला आहे.

         या संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप राजपूरे, सचिव गणेश चव्हाण यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले. त्याद्वारे त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी सोपान रामनाथ कासार हे कर्तव्य बजावत होते. वाळूने भरलेले दोन टिप्पर अडवून कारवाई करीत होते, त्यावेळी वाळू माफियांनी दगडफेक केली. रॉडने हल्ला केला. त्यात कासार यांच्या डोक्यास पायाला व हाताला मार लागला. मोबाईल व वाहनाचेही मोठे नुकसान झाले. या प्रकरणात संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही या संघटनेने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या