🌟परळी नगर परिषद कार्यालय येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी....!


🌟कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी संत शिरोमणी रोहिदास यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले🌟

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी नगर परिषद कार्यालय येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती शनिवार दि.२४ फेब्रुवारी रोजी कार्यालयात साजरी करण्यात आली. 

       संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या शिकवणुकीचा स्मरण करून त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्या भक्ती, समानता आणि सामाजिक न्यायाच्या संदेशाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी संत शिरोमणी रोहिदास यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.  नगर परिषद मुख्यधिकारी त्रिबक कांबळे, उपमुख्यधिकारी संतोष रोडे व नगर परिषद कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख शेख जमिल, सिध्देश्वर घोंगडे, मुक्तराम घुगे, विशाल पाठक, गंगाधर जगतकर, आरफत पटेल,विजय कांबळे, भगवान कसबे, रमेश मुंडे, संघनंद कांबळे, महेश बोटूळे, कुमार सावजी, संदिप हजारे तसेच नगर परिषद कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या