🌟परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बेरोजगार उमेदवारांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन.....!


🌟महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू अल्पसंख्यांक बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी🌟

परभणी (दि.29 फेब्रुवारी) :  जिल्ह्यातील अल्पसंख्यांक (मुस्लिम, बौध्द, जैन, विश्चन, पारशी) बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी, दि मेमन मर्चट असोशिएशन, हाजी अब्दूल रशिद चेरिटेबल ट्रस्ट व सेंटर फॉर एज्युकेशनल एक्सलन्स, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 3 मार्च, 2024 रोजी पाडेला फंक्शन हॉल, वकील कॉलनी येथे सकाळी 10 वाजता पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे उपलब्ध नसल्या कारणामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू अल्पसंख्यांक बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून  या मेळाव्यास विविध नामांकित स्थानिक तसेच राज्यातील मोठे उद्योजक कंपन्या सहभाग नोंदविणार आहेत. तसेच या रोजगार मेळाव्यामध्ये सौदीअरेबीया, अरब अमिरात, कुवेत, जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंग्लड इत्यादी देशांमध्ये नौकरी प्राप्त करून घेण्यासाठी प्रशासनामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विदेशामध्ये नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते.

महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जिल्हयातील अल्पसंख्यांक उमेदवारांनी (मुस्लिम, बौध्द, जैन, ख्रिश्चन, पारशी) नाव नोंदणी महाराष्ट्र शासनाच्या (mahaswayam.gov.in) या वेबसाईटवर करावी, नाव नोंदणीची सुविधा महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी देखील करण्यात आलेली आहे. महारोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष नावनोंदणी करणेसाठी दि. 3 मार्च 2024 रोजी सकाळी 09:30 वाजता आपल्या शैक्षणिक किंवा अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त अल्पसंख्यांक (मुस्लिम, बौध्द, जैन, ख्रिश्चन, पारशी) बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यास सहभाग नोंदवावा तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452 220074 व 9860015383, 9623020934, 9881524643 9890828797 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधाण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी केले आहे......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या