🌟नरवीर तानाजी मालुसरे प्राणार्पण दिन : मराठा साम्राज्याचा सेनापती तानाजी मालुसरे.....!


🌟नरवीर तानाजी मालुसरे यांचा जन्म सन १६२६ साली गोडवली जिल्हा सातारा येथे झाला🌟

 सिंहगडची लढाई दि.४ फेब्रुवारी १६७० रोजी सिंहगड किल्ल्यावर, त्या काळात कोंढाणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंढिन्यात रात्री दरम्यान झाली. मराठा साम्राज्याचा सेनापती तानाजी मालुसरे आणि सिंहगडचा राजपूत किल्लेदार उदयभानसिंग राठोड यांच्यात लढाई झाली. त्यातच नरवीर तानाजींने आपले प्राणार्पण केले. पुढे वाचा, श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजींच्या सदर संकलित लेखात ज्ञानवर्धक माहिती... संपादक.

         नरवीर तानाजी मालुसरे यांचा जन्म सन १६२६ साली गोडवली जि.सातारा येथे झाला. हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता. नरवीर तानाजी मालुसरे यांचे एक स्मारक रायगड मधील महाड तालुक्यामध्ये असणाऱ्या आंबेशिवथर गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या तसेच भारतीय लष्करामध्ये कार्यरत असणाऱ्या सैनिकांनी व गावातील शहरात असणाऱ्या नोकरदार वर्गाने पुढाकार घेऊन आपल्या वैयक्तिक निधीतून उभे करण्यात आले आहे. हे स्थान महाड पासून ३० किमी अंतरावर निसर्गसानिद्यात आहे. सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात त्यांचे बालपण गेले. लहान पणापासूनच डोंगरदऱ्यांची माहिती असलेला हा तरुण. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे तारुण्य उंबरठ म्हणजेच त्यांचा शेलारमामा यांच्या गावी गेले. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना प्रत्येकी हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती. तानाजींचा मृतदेह किल्ल्यावरून ज्या मार्गाने कोकणात नेला त्या मार्गाला मढे घाट म्हणतात. स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणाऱ्या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजींवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठ या गावात येऊन ते राहिले होते. आपलेपणाने वागून या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले.

          सिंहगडची लढाई दि.४ फेब्रुवारी १६७० रोजी सिंहगड किल्ल्यावर, त्या काळात कोंढाणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंढिन्यात रात्री दरम्यान झाली. मराठा साम्राज्याचा सेनापती तानाजी मालुसरे आणि सिंहगडचा राजपूत किल्लेदार उदयभानसिंग राठोड यांच्यात लढाई झाली. वेढा घेण्याच्या वेळी तानाजीने यशवंत घोरपडेच्या मदतीने किल्ल्याकडे जाणाऱ्या एका उंच खडकावर पॊचला. गडावर चढताना मराठ्यांना पहारेकऱ्यांनी रोखले होते आणि यावेळी पहारेकरी व काही घुसखोर यांच्यात लढाई झाली. उदयभान आणि तानाजी एकाच युद्धात गुंतले. उदयभानने तानाजीची ढाल फोडली आणि त्याची भरपाई केली. त्याने त्याच्या शेजारीच आपल्या पगडीचे कपड लपेटले आणि लढाई सुरूच ठेवली, लवकरच थोड्यावेळ उदयभानने त्याचे कवच तोडले. पण तानाजीने त्याचा सामना केला, ते दोघे युद्धामध्ये मारले गेले. दुसऱ्या मार्गावरून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेतला.

            नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील आधारित तान्हाजी चित्रपट रिलीज झालाय. सिनेमा सगळीकडेच गर्दी खेचतोय. या निमित्ताने नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या वंशजांविषयी कुतूहल आहे. त्यांचे वंशज कोण आहेत? ते काय करतात? त्यांचे वास्तव्य कोठे आहे?  याबाबत माहिती मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत. नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज कै.शिवराज बाळकृष्ण मालुसरे यांच्या पत्नी डॉ.शीतल मालुसरे व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. डॉ.शीतल मालुसरे महाड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत, तर मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. डॉ.शीतल यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या इतिहासावर पीएचडी पूर्ण केली आहे. तसेच त्या राज्यात आणि राज्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर व्याख्याने देतात. तसेच कवियत्री म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. तानाजींचे मूळ गाव कोणते? मालुसरे परिवार मुळचा कुठला? त्यांची पार्श्वभूमी काय? तानाजी मालुसरे यांच्या परिवाराचे पुढे काय झाले? याबद्दल जाणून घेण्याची अनेकांमध्ये उत्सुकता आहे. मालुसरे परिवार हा मूळचा पाचगणी जवळील गोडोली गावचा. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजीराव यांचे तेथे वास्तव्य होते. तानाजी मालुसरे यांचे बालपण गोडोली येथे गेले. शिवरायांनी बालपणातच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हापासूनच तानाजी मालुसरे शिवरायांच्या सोबतच होते. तेथून पुढे शिवरायांच्या अनेक मोहिमा, लढायांमध्ये विश्वासू सहकारी म्हणून तानाजी सहभागी असत. त्यांच्यातील स्वराज्यनिष्ठा व लढवय्येपणा हेरून शिवरायांनी त्यांना महाबळेश्वर-पोलादपूर परिसरातील बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी या भागात दरोडेखोरांचा मोठा उपद्रव वाढला होता. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उमरठ या गावी ते आपल्या परिवारासह स्थायिक झाले. नंतर सन १६५९मध्ये प्रतापगडावर शिवराय व अफजलखान यांच्याबरोबर झालेल्या युद्धात त्यांनी अफजल खानाच्या सैन्याचा समाचार घेतला होता. नरवीर तानाजी अजरामर झाले ते सिंहगडाच्या लढाईत. सन १६६५मध्ये झालेल्या पुरंदराच्या मिर्झाराजे जयसिंगाबरोबर झालेल्या तहानुसार स्वराज्यातील २३ गड-किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते. त्यात सिंहगडाचा देखील समावेश होता. परंतु पुढे महाराज मोठ्या शिताफतीने आग्र्याच्या कैदेतून सुटून आले. तहात दिलेले सर्व गड-किल्ले परत स्वराज्यात सामील करण्याचा सपाटा त्यांनी लावला.

          राजगड मुक्कामी असताना राजमाता जिजाऊ व शिवरायांना समोरील सिंहगड पारतंत्र्यात असल्याची खंत होती. त्यावेळी गडाचे नाव कोंढाणा होते. महाराजांचा मनसुबा ऐकून लढवय्या तानाजी मालुसरे यांचा मराठी बाणा जागृत झाला. आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे, असे म्हणत सिंहगड स्वराज्यात आणण्याचा विडा त्यांनी उचलला. अष्टमीच्या काळोखात तानाजी मोजक्या मावळ्यांसह गड घेण्यासाठी डोणागिरिच्या कड्याला बिलगले. युद्धात तानाजी व उदयभान हे दोन वीर समोरासमोर आले. या दोन लढावया योद्धामध्ये घनघोर युद्ध झाले. दि.४ फेब्रुवारी १६७० रोजी सिंहगडावर उदयभानच्या एका वाराने तानाजी धारातीर्थी पडले. भाऊ सूर्याजी व शेलार मामा यांनी चवताळून उदयभानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. उदयभानाचा खात्मा करून गडावर भगवा निशाण चढवून गड स्वराज्यात दाखल केला. स्वराज्यासाठी तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या मावळ्यांना युद्धात वीर मरण आले, तर त्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी महाराजंकडून नेहमीच घेतली जात असे. त्यानुसार पुढील काही महिन्यातच तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे रायबाचे लग्न यथोचित पार पाडले. त्यास बेळगाव जवळील पारगडची किल्लेदारी दिली. मालुसरे घराण्याचे व स्वराज्याचे नाते अधिक घट्ट केले. त्यावेळी उमरठचे मालुसरे कुटुंबीय व काही लोक पारगड येथे स्थलांतरित झाले. अलीकडच्या काळात पारगडचे मालुसरे कुटुंब शिक्षणासाठी व उदरनिर्वाहासाठी बेळगाव, महाडला स्थायिक झाले आहेत.

!! नरवीर तानाजी मालुसरेजींना स्मृतिदिनी मानाचा लवून मुजरा!!

           - संकलन व शब्दांकन -

                 श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                  पोटेगावरोड, गडचिरोली.

                   फक्त मधुभाष- ७१३२७९६६८३.


       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या