🌟पुर्णा शहरवासीयांनी काढला नगर पालिकेवर घागर मोर्चा : शहरातील माता-भगिनीही झाल्या मोर्चात सहभागी🌟
पुर्णा (दि.१६ फेब्रुवारी) - पुर्णा नदीपात्रावरील कोल्हापूरी बंधारा दुरुस्तीसह पाणीपुरवठा योजनेवर कोट्यावधी रुपयाची उधळपट्टी केल्यानंतर देखील पुर्णा शहरातील पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच गंभीर स्वरूप धारण करीत असल्याचे निदर्शनास येत असून मागील जवळपास पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला असतांना देखील पुर्णा नगर परिषद प्रशासनासह नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ नगर परिषद प्रशासन पाण्याचे नियोजन लावत आहे असे म्हणून वेळकाढूपणा करीत असून दुसरीकडे मात्र निकृष्ट दर्जाच्या विकासकामांसाठी कमालीची तात्पुरता दाखवली जात असून शहरात सर्वत्र कोट्यावधी रुपयांच्या निकृष्ट दर्जाच्या विकासकामांचा सपाटाच सुरू असल्याने तीव्र असंतोष निर्माण झाल्याने आज शुक्रवार दि.१६ फेब्रुवारी रोजी पाण्याच्या गंभीर प्रश्ना विरोधात पुर्णा शहरातील नागरिकांनी बेजबाबदार नगर परिषद प्रशासन व मुख्याधिकारी युवराज पौळ यांच्या बेजबाबदार कारभारा विरोधात 'घागर मोर्चा' काढून संताप व्यक्त केला सदरील मोर्चाला शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथून सुरुवात करण्यात आली सिद्धार्थ नगर,भिम नगर मार्गे नगर पालिकेवर हा मोर्चा धडकला या मोर्चात मात/भगिनींनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता.
यावेळी मोर्चेकर आंदोलकांकडून देण्यात आलेल्या निवेदनात पूर्णेकरांना तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे,शहरात प्रत्येकवर्षी उद्भवणारी पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी दूर होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी,पुर्णा नदीपात्रावरील झिरपणारा कोल्हापूरी बंधारा कायमस्वरूपी दुरुस्त होत नसेल तर सदरील बंधारा पाडून नवीन कोल्हापूरी बंधारा बांधण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा व मजबूत व उपयुक्त असा कोल्हापूरी बंधारा बांधावा,तसेच उपलब्ध असलेल्या पाण्याचे नीट नियोजन करावे ज्याने करुन शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात फेब्रुवारी ते जुन या जवळपास साडे महिन्यांच्या कालावधीत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही यासह विभागनिहाय अनिश्चित वेळांमुळे वाया जाणारे पाणी वाचवा आणि विभागनिहाय गरजेनुसार आणि संबंधित ठिकाणच्या चढ-उतारानुसार वेळा निश्चिती कराव्यात,शहरातील जुन्या झालेल्या पाईपलाईन्समुळे ठिकठिकाणी पाणी वाया जात असल्यामुळे त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यात यावी,शहरासाठी मंजूर झालेल्या 'वॉटर फिल्टरचे' काम तात्काळ सुरु करुन नागरिकांना स्वच्छ व निर्जंतुक पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यात यावे तसेच पाण्याच्या सर्व समस्या दूर करून कधी काही कारणास्तव पाण्याची समस्या निर्माण होत असेल तर नागरिकांना नियमितपणे दवंडीद्वारे कळविले जावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या असून या निवेदनावर नसीर शेख,प्रबुद्ध काळे,सुबोध खंदारे,अजय खंदारे,अमोल पट्टेकर, वैभव जाधव,भूषण भुजबळ,दुर्गेश वाघमारे,तुषार इंगोले,अभिजित बलखंडे,शुभम गायकवाड,अनिल नरवाडे,विशाल खंदारे,सुकेशनी भुजबळ, उत्पलवर्णा खंदारे,छाया कांबळे,जोंधळे बाई,भारत बाई, वाघमारे बाई,गजभारे बाई इत्यादींसह असंख्य नागरीक माता भगिनींच्या स्वाक्षऱ्या आहेत......
0 टिप्पण्या