🌟मंगरुळपीर येथे ब्राम्हण सेवा समितीकडुन मनोज जरांगे यांचा जाहीर निषेध.....!


🌟ब्राम्हण समाजाबद्दल केलेल्या व्देषपुर्ण व्यक्तव्याबद्दल कारवाई करण्याची मागणी : प्रशासनाला लेखी निवेदने सादर🌟


वाशिम:-मनोज जरांगे यांनी ब्राम्हण समाजाबद्दल आणी महाराष्टाच्या मुख्यमंञ्यांविरोधात व्देषपुर्ण व्यक्तव्य केल्यामुळे मंगरुळपीर येथील ब्राम्हण सेवा समितीकडुन निषेध व्यक्त करण्यात आला तसेच याप्रकरणी जरांगेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगरुळपीर येथील ठाणेदार,ऊपविभागिय अधिकारी तसेच तहसिलदार यांना मागण्यांचे लेखी निवेदन सादर करण्यात आले.


मराठा आरक्षणाचा मुद्दा आता वेगळे वळण घेतांना दिसत आहे.सरकारने मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर करुन दहा टक्के आरक्षण देण्याचे ठरवले परंतु या प्रश्नावरुन होत असलेले व्यक्तव्य आता महाराष्टात वादाला तोंड फोडत असल्याचे एकंदरीत चिञ आहे.तिन दिवसापुर्वी मनोज जरांगे यांनी ब्राम्हण समाजाबद्दल जे व्देषपुर्ण व्यक्तव्य केले त्याचे पडसाद आता सर्वञ ऊमटत आहे.मंगरुळपीर येथेही या व्यक्तव्याचा ब्राम्हण सेवा समितीकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तसेच जरांगेवर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठीही प्रशासनाला लेखी निवेदने सादर करण्यात आले.तिन दिवसापुर्वी मनोज जरांगे यांनी महाराष्टाचे ऊपमुख्यमंञी व ब्राम्हण समाजाबद्दल जे व्देषपुर्ण व्यक्तव्य केले त्यामुळे जातीय तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शंकाही व्यक्त केल्या जात आहे.महाराष्टातील जातीय सलोखा बिघडवण्याचे काम मनोज जरांगे यांनी केल्याचा आरोपही होत आहे.त्यामुळे सदर प्रकरणी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मंगरुळपीर येथील ब्राम्हण सेवा समितीकडुन लेखी निवेदनाव्दारे प्रशासनाकडे केली आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या