🌟वाशिम जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक,मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांना सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अद्याप मिळाले नाही...!


🌟सातव्या वेतन आयोगाचे हप्ते व सेवा काळातील प्रलंबित देयके शालार्थ टॅबला मुदतीत त्वरित एन्ट्री करण्याची मागणी🌟


फुलचंद भगत

वाशिम :- शिक्षणअधिकारी वाशिम यांना दिलेल्या पत्रानुसार सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख यांचे प्रलंबित देयक 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत विहीत 26 नंबर च्या नमुन्यात तयार करून अनुदान मागणी करणे बाबत सुचविले आहे त्यानुसार कार्यालय आस्थापना बाबू यांचे कडे कार्यवाही पूर्ण करून घेण्याकामी दिनांक 15.2.24 पासून संघटनेचे पदाधिकारी व सेवानिवृत्त शिक्षक आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही सदर पत्रानुसार कार्यवाही पूर्ण होत असल्याचे दिसून येत नाही.


मुदतीत प्रलंबित देयकाची मागणी न झाल्यास मंगरुळपीर तालुका सेवानिवृत्त शिक्षक या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता वरिष्ठांनी त्वरित लक्ष केंद्रित करून कार्यवाही करण्यासाठी सबंधित प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.सेवानिवृत्त शिक्षकांना योग्य ते दिलासा देत सहकार्य करून लाभ वेळेत मिळवून द्यावा अशी लेखी निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे.सदर निवेदनावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख,शिक्षक आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या